Bigg Boss Marathi 4 : असं काय घडलं की अपूर्वा नेमळेकर म्हणतेय - माझं नाव कानफाट्या ठेवा आता...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 04:18 PM2022-10-10T16:18:48+5:302022-10-10T16:19:34+5:30
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भांडणासोबतच आज जरा मजामस्ती देखील बघायला मिळणार आहे. आज डायनिंग टेबलवर भांडण नाही तर सदस्य हसताना दिसणार आहेत.
छोट्या पडद्यावरील रिएलिटी शो बिग बॉस मराठीचा चौथा सीझन (Bigg Boss Marathi 4) २ ऑक्टोबर पासून कलर्स मराठी वाहिनीवर भेटीला आला आहे. यंदाच्या सीझनमध्ये प्रसाद जवादे, अमृता धोंडगे, निखिल राजशिर्के, किरण माने, समृद्धी जाधव, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, योगेश जाधव, अमृता देशमुख, यशस्वी मसुरेकर यांच्यासह इतर कलाकार सहभागी झाले आहेत. आज या सदस्यांचा घरातील सातवा दिवस आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भांडणासोबतच आज जरा मजामस्ती देखील बघायला मिळणार आहे. आज डायनिंग टेबलवर भांडण नाही तर सदस्य हसताना दिसणार आहेत.
कोण आहे कानफाट्या ? अपूर्वा का म्हणते आहे माझं नावं कानफाट्या ठेवा आता ... झालं असं रोहितने समृद्धीला विचारले तुझा आज बुबू बघितला नाही... त्यावर समृद्धीचे म्हणणे पडले, त्याला बरं नाही वाटतं आहे झोपला आहे. त्याला अपूर्वाची नजर लागली आहे, सारखी चिमटे काढत असते त्याला. त्यावर अपूर्वा म्हणाली, "झालं त्याला पण माझीच नजर लागली. कानफाट्या नावं ठेवलं आहे माझं. तिथल्या नेमप्लेट वरील माझं नावं बदलून कानफाट्या ठेवा. काही झालं तरी घुमून फिरून माझ्यावरचं येते आहे”.
बिग बिग बॉसची चौथा सीझन सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रसाद जवादे आणि अपूर्वा नेमळेकर यांच्यामध्ये प्रचंड वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले होते. अपूर्व नेमळेकरने प्रसाद जवादेला चांगलेच धारेवर धरले होते आणि माझ्यासोबत असा फालतूपणा अजिबात करायचा नाही, अशी समज देखील तिने त्याला दिली होती.