Bigg Boss Marathi 4 : कोण होईल बिग बॉसच्या घरातील पहिला कॅप्टन ?, घरामध्ये रंगणार पहिले कॅप्टन्सी कार्य !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 11:46 IST2022-10-07T11:43:00+5:302022-10-07T11:46:22+5:30
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल चान्स पे डान्स या उपकार्यात टीम A विजयी ठरली.

Bigg Boss Marathi 4 : कोण होईल बिग बॉसच्या घरातील पहिला कॅप्टन ?, घरामध्ये रंगणार पहिले कॅप्टन्सी कार्य !
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल चान्स पे डान्स या उपकार्यात टीम A विजयी ठरली. टीम A ने चौथ्या सिझनच्या पहिल्या साप्ताहिक कार्यात विजय मिळवला. साप्ताहिक कार्यात विजयी ठरल्याने टीम A मधील सदस्यांना पहिल्या आठवड्यातील कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवण्याची संधी मिळाली.
आता बघूया टीम B कोणकोणत्या सदस्यांकडून उमेदवारीची संधी हिरावून घेणार आणि कोण ठरणार पहिल्या कॅप्टन्सी कार्यचे उमेदवार. काल कॅप्टन पदाच्या उमेदवारीच्या शर्यतीमधून किरण माने, रुचिरा जाधव, प्रसाद जवादे आणि रोहित शिंदे हे सदस्य एलिमनेट झाले.
आज बिग बॉस सदस्यांना सांगणार आहेत, "आज बिग बॉसच्या घरात पडणार आहे पैशाचा पाऊस, आणि या पाऊसाचा आनंद लुटणाऱ्या उमेदवाराला मिळणार आहे पहिले कॅप्टन पद मिळवण्याचा बहुमान. आपल्यासोबतच अवघा महाराष्ट्र उत्सुक आहे हे बघण्यासाठी बिग बॉस मराठी सिझन चारच पहिला कॅप्टन कोण होईल. त्यामुळे सुरु करूया बिग बॉस मराठी सिझन चारचे पहिले कॅप्टन्सी कार्य”!