'बिग बॉस'च्या घरात वादाची ठिणगी! निक्कीवरुन आर्या-अरबाज एकमेकांना भिडले, बघा काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 12:43 PM2024-07-31T12:43:54+5:302024-07-31T12:44:49+5:30

आर्या जाधव-अरबाज पटेलमध्ये बिग बॉसच्या घरात खडाजंगी झाली असून निक्की तांबोळी कारण बनल्याची चर्चा आहेे. पाहा नवीन प्रोमो (bigg boss marathi 5)

bigg boss marathi 5 aarya Jadhav fight with nikki tamboli and arbaz patel promo release | 'बिग बॉस'च्या घरात वादाची ठिणगी! निक्कीवरुन आर्या-अरबाज एकमेकांना भिडले, बघा काय घडलं

'बिग बॉस'च्या घरात वादाची ठिणगी! निक्कीवरुन आर्या-अरबाज एकमेकांना भिडले, बघा काय घडलं

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची सध्या चांगलीच चर्चा आहे. या नवीन सीझनमध्ये एकापेक्षा एक भन्नाट स्पर्धक सहभागी आहेत. अशातच आज घरात एकीकडे 'नॉमिनेशनची तोफ' हे पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. पहिल्याच टास्क दरम्यान घरातील सदस्यांमध्ये मोठं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे. निक्की तांबोळी आणि आर्या जाधव यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होणार आहे. तसेच आर्याने अरबाजला आणि वैभव चव्हाणलादेखील फटकारलेलं दिसलंय.

आर्याने निक्कीला दिली धमकी?

'बिग बॉस मराठी'चा नवा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये निक्की तांबोळी आणि आर्या जाधव एकमेकांसोबत मोठमोठ्याने भांडताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये आर्याला निक्कीचा चांगलाच राग आलेला दिसून येत आहे. आर्या निक्कीला "तुला घाबरायला पाहिजे",म्हणत धमकी देताना दिसत आहे. तर निक्की तिला "फट्टू" म्हणते. त्यावर निक्की तिला "वेडी" म्हणते. आर्या पुढे म्हणते,"मला शांत करायचं नाही". आर्या आणि निक्कीचा राग अनावर झाला आहे. त्यामुळे नॉमिनेशन टास्क दरम्यान आणखी रंगत येणार आहे. 


पहिल्या आठवड्यात 'हे' सदस्य झालेत नॉमिनेट

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील पहिल्या आठवड्यात सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, अंकिता प्रभू-वालावलकर, सूरज चव्हाण आणि कोल्हापूरच्या पुरुषोत्तमदादा पाटील या सदस्यांचा समावेश आहे. आता या सहा सदस्यांमधून कोण 'बिग बॉस मराठी'च्या घराचा निरोप घेणार हे पाहावे लागेल. रितेश देशमुख शनिवार-रविवार विकेंड का वार होस्ट करायला येईल, तेव्हा याचा खुलासा होईल.

Web Title: bigg boss marathi 5 aarya Jadhav fight with nikki tamboli and arbaz patel promo release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.