माफी माग! निक्कीच्या कानशिलात लगावल्यावर आर्याला मराठी अभिनेत्याचा मोलाचा सल्ला, म्हणाला- "ते तुला नक्कीच..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 11:47 IST2024-09-14T11:46:45+5:302024-09-14T11:47:18+5:30
टास्क चालू असताना आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. आर्याने बिग बॉसच्या घरातील नियम मोडल्याने तिला घराबाहेर जावं लागण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याने आर्याला एक मोला सल्ला दिला आहे.

माफी माग! निक्कीच्या कानशिलात लगावल्यावर आर्याला मराठी अभिनेत्याचा मोलाचा सल्ला, म्हणाला- "ते तुला नक्कीच..."
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांमध्ये रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वाद, भांडण होताना दिसतात. टास्कदरम्यानही सदस्य आक्रमक होतात. घरात नुकत्याच पार पडलेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्या आणि निक्कीमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं. टास्क चालू असताना आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. त्यामुळे तिला जेलमध्ये राहण्याची शिक्षा देण्यात आली आहे.
आर्याने बिग बॉसच्या घरातील नियम मोडल्याने तिला घराबाहेर जावं लागण्याची शक्यता आहे. आजच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख आर्याला याचा जाब विचारत तिला शिक्षा देणार आहे. पण, या संपूर्ण प्रकरणानंतर मराठी अभिनेता अभिजीत केळकरने आर्याला एक मोला सल्ला दिला आहे. अभिजीतने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये त्याने आर्याला सल्ला दिला आहे.
"आर्या, तुझं नडणं, तुझं भिडणं, एकटीनं खेळणं, सगळं आवडत होतं पण...हा खेळ संयमाचाही आहे. मानसिक संतुलनाचाही आहे. हिंसेचं समर्थन नाहीच करता येणार...पण माफी माग, तू genuine आहेस, ते तुला नक्की एक संधी देतील", असं अभिजीतने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घरात या आठवड्यात अग्रेशनच्या सगळ्या सीमा पार करण्यात आल्या. धक्काबुक्कीत आर्याला निक्कीचा हात लागला. त्यानंतर आर्याचा संयम सुटला आणि आता मारेल असं म्हणत तिने निक्कीच्या कानशिलात लगावली. आर्याने बिग बॉसच्या मुलभूत नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे आता तिला काय शिक्षा मिळणार हे पाहावं लागेल.