Bigg Boss Marathi : संग्रामने घरात येताच निक्कीची जिरवली, मराठी अभिनेता म्हणतो- "खोकल्यावर उपाय केलात, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 12:27 PM2024-09-10T12:27:13+5:302024-09-10T12:27:49+5:30

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात येताच संग्रामने निक्कीशी पंगा घेतला. संग्रामच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीनंतर आता मराठी अभिनेत्याने राखी सावंतला घरात आणण्याची मागणी केली आहे.

bigg boss marathi 5 abhijeet kelkar demands to bring back rakhi sawant in house after sangram choughule wild card entry to compete nikki | Bigg Boss Marathi : संग्रामने घरात येताच निक्कीची जिरवली, मराठी अभिनेता म्हणतो- "खोकल्यावर उपाय केलात, पण..."

Bigg Boss Marathi : संग्रामने घरात येताच निक्कीची जिरवली, मराठी अभिनेता म्हणतो- "खोकल्यावर उपाय केलात, पण..."

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात सोमवारी पहिल्या वाइल्ड कार्डची एन्ट्री झाली. बॉडीबिल्डर संग्राम चौगुलेने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. संग्रामने घरात येताच निक्की आणि अरबाजला टार्गेट करत त्यांना हिसका दाखवला. वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या संग्रामवर घरात येताच बिग बॉसने एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली. 

संग्रामला बिग बॉसने एक कार्य पार पाडण्यास सांगतिले. या कार्यात संग्रामच्या मते अपात्र असलेल्या सदस्यांना स्विमिंगपूलमध्ये उडी मारायची होती. संग्रामने अपात्र ठरवलेल्या सदस्यांना या आठवड्यात घरातील कोणत्याही फर्निचरचा वापर करता येणार नाहीये. याशिवाय त्यांना संपूर्ण आठवडाभर फक्त उकडलेलेच पदार्थ खाता येणार आहेत. या कार्यात संग्रामने अंकिता, वैभव, अरबाज, आर्या यांच्याबरोबर निक्कीलाही पाण्यात ढकललं. पण, निक्की पाण्यात उडी मारण्यासाठी तयार नव्हती. बिग बॉसने निक्कीला स्पष्ट आदेश दिल्यानंतरही निक्कीने उडी मारली नाही. त्यामुळे मग संग्रामनेच तिला धक्का देत स्विमिंगपूलमध्ये ढकललं. बिग बॉसच्या घरातील हा टास्क पार पडल्यानंतर मराठी अभिनेता अभिजीत केळकरने पोस्ट शेअर केली आहे. 

अभिजीतने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये याबाबत पोस्ट शेअर केली आहे. "वाह वाह बिग बॉस लव्ह यू", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर आणखी एक पोस्ट त्याने शेअर केली आहे. "बिग बॉस ये दिल मांगे मोअर...खोकल्यावर उपाय केलात, पण नाक अजून फुरफुरतंय, आता सर्दी घालवायला राखीला परत आणा", असं अभिजीतने लिहिलं आहे. 

दरम्यान, गेल्या आठवड्यात छोटा पुढारी घनश्याम दरवडेचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. तर या आठवड्यात धष्टपुष्ट शरीरयष्टी असलेल्या संग्राम चौगुलेने वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतल्याने खेळात मोठा ट्विस्ट आला आहे. आता बिग बॉसचा खेळ अधिक रंजक होताना दिसत आहे. यामुळे घरातील समीकरणं बदलणार आहेत. तर आता दुसऱ्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीचीही चर्चा होऊ लागली आहे. 
 

Web Title: bigg boss marathi 5 abhijeet kelkar demands to bring back rakhi sawant in house after sangram choughule wild card entry to compete nikki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.