अरबाज आणि अभिजीतला मिळणार विशेष पॉवर, कोणाला करणार सेफ? सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 11:49 AM2024-08-13T11:49:02+5:302024-08-13T11:50:11+5:30

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : अरबाज आणि अभिजीतला पाच सेफ कार्ड बिग बॉसकडून देण्यात येणार आहेत. हे कार्ड वापरुन त्यांना घरातील काही सदस्यांना या आठवड्यासाठी सेफ करता येणार आहे.

bigg boss marathi 5 abhijeet sawant and arbaaz patel gets special power to save some contestant | अरबाज आणि अभिजीतला मिळणार विशेष पॉवर, कोणाला करणार सेफ? सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

अरबाज आणि अभिजीतला मिळणार विशेष पॉवर, कोणाला करणार सेफ? सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना सरप्रायजेस मिळत आहेत. एकामागोमाग एक नवे ट्विस्ट रोज बिग बॉसच्या घरात सदस्यांना मिळत आहेत. त्यामुळे यंदाचा सीझन खऱ्या अर्थाने रोमांचक होत चालला आहे. आता बिग बॉसच्या घरातील तिसरा आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात अभिजीत आणि अरबाजला एक खास पॉवर मिळाली आहे. 

अरबाज आणि अभिजीतला पाच सेफ कार्ड बिग बॉसकडून देण्यात येणार आहेत. हे कार्ड वापरुन त्यांना घरातील काही सदस्यांना या आठवड्यासाठी सेफ करता येणार आहे. याचा नवा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये बिग बॉस अरबाज आणि अभिजीतला या सेफ कार्डबद्दल सांगताना दिसत आहेत. आता हे कार्ड वापरुन अभिजीत आणि अरबाज कोणाला सेफ करणार? आणि घरातील कोणत्या सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार असणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे. 


दरम्यान, सध्या घरात दोन चिमुकले पाहुणे आले आहेत. या पाहुण्यांना सांभाळण्याची आणि त्यांचं मनोरंजन करण्याची जबाबदारी घरातील सदस्यांवर आहे. या टास्कमध्ये आता कोणती टीम जिंकणार हे पाहावं लागणार आहे. 

'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक 

वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण

Web Title: bigg boss marathi 5 abhijeet sawant and arbaaz patel gets special power to save some contestant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.