आता अरबाज घराबाहेर जाईल! नॉमिनेशन टास्कनंतर अभिजीतचं स्पष्ट मत, म्हणतो- "तो फक्त निक्कीच्या..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 09:03 AM2024-09-17T09:03:02+5:302024-09-17T09:03:40+5:30

Bigg Boss Marathi 5 : या आठवड्यात निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षाताई आणि सूरज हे सदस्य थेट नॉमिनेट झाले. टीम B नॉमिनेट झाल्यानंतर अभिजीत, पॅडी आणि संग्राममध्ये घराबाहेर कोण जाणार याबाबत चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.

bigg boss marathi 5 abhijeet sawant said this week arbaaz patel will nominate | आता अरबाज घराबाहेर जाईल! नॉमिनेशन टास्कनंतर अभिजीतचं स्पष्ट मत, म्हणतो- "तो फक्त निक्कीच्या..."

आता अरबाज घराबाहेर जाईल! नॉमिनेशन टास्कनंतर अभिजीतचं स्पष्ट मत, म्हणतो- "तो फक्त निक्कीच्या..."

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात आठवड्याच्या सुरुवातीलाच नॉमिनेशन कार्य पार पडलं. या टास्कमध्ये बिग बॉसकडून दोन टीम बनवण्यात आल्या होत्या. टीम A मध्ये निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षाताई आणि सूरज होते. तर अभिजीत, अंकिता, पॅडी, धनंजय आणि संग्राम हे सदस्य टीम B मध्ये होते. नॉमिनेशनसाठी जंगलराजचा टास्क सदस्यांना देण्यात आला होता. या टास्कमध्ये प्रत्येक टीममधील एक सदस्य प्रतिस्पर्ध्याला भिडणार होता. 

बिग बॉसने दिलेल्या या कार्यात एक बंदूक ठेवण्यात आली होती. दोन्ही टीममधील जो सदस्य बंदूक उचलून पहिलं चौकटीत जाईल त्या टीमला गुण मिळणार होते. विशेष म्हणजे या टास्कमध्ये संपूर्ण टीम नॉमिनेट होणार होती. त्यामुळे सदस्यांनाही हा टास्क खेळताना कोणतीही कसर सोडली नाही. या नॉमिनेशन टास्कमध्ये टीम B विजयी झाली. तर कमी गुण मिळाल्यामुळे टीम A मधील निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षाताई आणि सूरज हे सदस्य थेट नॉमिनेट झाले. 

टीम B नॉमिनेट झाल्यानंतर अभिजीत, पॅडी आणि संग्राममध्ये घराबाहेर कोण जाणार याबाबत चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. अभिजीत म्हणतो, "अरबाज यावेळेला जाऊ शकतो". त्यावर संग्राम म्हणतो की "मग निक्की काय करेल?". त्यावर अभिजीत म्हणतो, "आता तर गुलूगुलू मध्ये सगळं संपतं". पॅडीही त्याला साथ देत "अर्धा वेळच त्याच्यात जातो" असं म्हणतो. "तो पण फक्त टास्कसाठी येतो. टास्क झाला की तो परत आपल्या गुहेत जातो. सिंह कसा शिकारीला जात नाही. शिकार सिंहिणी करतात", असं अभिजीत नंतर म्हणत आहे. 


दरम्यान, गेल्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यावर सदस्यांना रितेशकडून ताकीद मिळाली आहे. आर्याने टास्कमध्ये निक्कीच्या कानाखाली मारल्याने तिला घराबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. तर गेल्या आठवड्यात वैभव चव्हाणने घराचा निरोप घेतला. आता या आठवड्यात कोणत्या सदस्याचा प्रवास संपणार हे पाहावं लागेल.
 

Web Title: bigg boss marathi 5 abhijeet sawant said this week arbaaz patel will nominate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.