कडक सीन! कडक अ‍ॅक्टर! जान्हवीने पॅडीची माफी मागितल्यावर 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्रीची खोचक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 12:28 PM2024-08-22T12:28:59+5:302024-08-22T12:29:31+5:30

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात जान्हवीने पॅडीची माफी मागितली. पण, जान्हवीच्या या माफीनाम्यावरुन मराठी अभिनेत्री अनघा अतुलने तिला खोचक टोला लगावला आहे.

bigg boss marathi 5 angha atul criticized janhavi killekar after she appologized to paddy kambale | कडक सीन! कडक अ‍ॅक्टर! जान्हवीने पॅडीची माफी मागितल्यावर 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्रीची खोचक पोस्ट

कडक सीन! कडक अ‍ॅक्टर! जान्हवीने पॅडीची माफी मागितल्यावर 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्रीची खोचक पोस्ट

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात जान्हवीने पॅडी कांबळेला जोकर आणि ओव्हरअॅक्टिंग करतो, असं म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. जान्हवीच्या या वक्तव्यानंतर तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. तर सेलिब्रिटींनीही जान्हवीच्या या वागण्यावर संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर मात्र जान्हवीला तिची चूक समजली. आणि तिने बिग बॉसच्या घरात पॅडीची माफीही मागितली. पण, जान्हवीच्या या माफीनाम्यावरुन मराठी अभिनेत्री अनघा अतुलने तिला खोचक टोला लगावला आहे. 

अनघाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने जान्हवीच्या माफीनाम्यावर टीका केल्याचं दिसत आहे. "आज रंग माझा वेगळाचा एपिसोड बघितला वेगळ्याच शोमध्ये! सीन असा होता की व्हिलन माफी मागतेय कारण ती पकडली गेली! कडक scene! कडक actor!", असं अनघाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. अनघाबरोबरच अनेक सेलिब्रिटींनीही जान्हवीला खडे बोल सुनावले आहेत. 


जान्हवी नेमकं काय म्हणाली?

नुकत्याच पार पडलेल्या टास्कदरम्यान जान्हवीने पॅडी कांबळेचा जोकर म्हणून उल्लेख केला. त्यानंतर तिने पॅडीला त्याच्या कामावरुन आणि अभिनयावरुनदेखील हिणवलं. "पॅडीदादाच्या काहीतरी अंगात घुसलंय. आयुष्यभर ओव्हरअ‍ॅक्टिंग करुन करुन दमले. आता तीच ओव्हरअ‍ॅक्टिंग घरात दाखवत आहेत", असं जान्हवी पॅडीला म्हणाली.

दरम्यान, बिग बॉस मराठीचा चौथा आठवडा सुरू झाला असून दिवसेंदिवस हा खेळ अधिक रंजक होत चालला आहे. योगिता चव्हाणबरोबर निखिल दामलेचाही बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास संपला आहे. सुरुवातीला कॅप्टन्सी कार्य जिंकून अरबाज यंदाच्या आठवड्याचा कॅप्टन झाला होता. पण, बिग बॉसने खेळात मोठा ट्विस्ट आणल्याने अरबाजने निक्कीला घराचा कॅप्टन बनवलं आहे. 
 

Web Title: bigg boss marathi 5 angha atul criticized janhavi killekar after she appologized to paddy kambale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.