मुंबईत कधीही न आलेल्या वडिलांना बिग बॉसच्या घरात पाहून अंकिता ढसाढसा रडली, भावुक करणारा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 09:57 AM2024-09-27T09:57:16+5:302024-09-27T09:57:53+5:30

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये या आठवड्यात सदस्यांचे कुटुंबीय त्यांची भेट घेण्यासाठी येणार आहेत. कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावालकरला बिग बॉसकडून एक सुखद धक्का मिळाला आहे. 

bigg boss marathi 5 ankita walawalkar gets emotional after seen her father in house video | मुंबईत कधीही न आलेल्या वडिलांना बिग बॉसच्या घरात पाहून अंकिता ढसाढसा रडली, भावुक करणारा व्हिडिओ

मुंबईत कधीही न आलेल्या वडिलांना बिग बॉसच्या घरात पाहून अंकिता ढसाढसा रडली, भावुक करणारा व्हिडिओ

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये या आठवड्यात सदस्यांचे कुटुंबीय त्यांची भेट घेण्यासाठी येणार आहेत. इतके दिवस घरापासून आणि कुटुंबीयांपासून लांब राहिलेल्या आपल्या माणसांना पाहून घरातील सदस्य भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. कालच्या भागात वर्षाताई, अभिजीत, धनंजय आणि जान्हवी या सदस्यांचे कुटुंबीय घरात आलेले दिसले. या सदस्यांना बिग बॉसने खास सरप्राइज दिलं. आता कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावालकरला बिग बॉसकडून एक सुखद धक्का मिळाला आहे. 

अंकिताच्या बहिणींबरोबरच तिचे वडीलही कोकण हार्डेट गर्लला भेटण्यासाठी बिग बॉस मराठीच्या घरात येणार आहेत. बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अंकिताच्या बहिणी सुरुवातीला घरात आल्याचं दिसत आहे. त्यानंतर अंकिताला बिग बॉसकडून एक सरप्राइज मिळतं. कोकण हार्टेड गर्लच्या ध्यानीमनी नसताना बिग बॉसच्या घरात तिच्या बाबांची एन्ट्री होती. वडिलांना पाहताच अंकिताला रडू कोसळतं आणि ती ढसाढसा रडत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. बिग बॉसच्या घरातील हा भावुक करणारा व्हिडिओ समोर आला आहे. 


कधीच मुंबईत न आलेल्या वडिलांना 'बिग बॉस मराठी'मुळे मुंबईत येण्याची संधी मिळाली, यासाठी अंकिता 'बिग बॉस मराठी'चे आभारही मानत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, पुढच्या आठवड्यात 'बिग बॉस मराठी'चा हा सीझन संपणार आहे. ६ ऑक्टोबरला 'बिग बॉस मराठी'चा अंतिम सोहळा रंगणार असून 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता मिळणार आहे. आता घरात राहिलेल्या वर्षाताई, अभिजीत, पॅडी, अंकिता, सूरज, जान्हवी, निक्की, धनंजय या सदस्यांपैकी कोण 'बिग बॉस मराठी'ची ट्रॉफी नावावर करणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. 
 

Web Title: bigg boss marathi 5 ankita walawalkar gets emotional after seen her father in house video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.