अभिजीतने निक्कीला "खिलाडी" म्हटल्याचं DP ला खुपलं, अंकिता म्हणाली, "त्याला insecurity आहे, म्हणून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 12:22 PM2024-08-12T12:22:00+5:302024-08-12T12:22:25+5:30

Bigg Boss Marathi Season 5 Contestants :अभिजीतने खिलाडी म्हणून निक्कीचा उल्लेख केल्याने त्याच्या टीममधील सदस्यांमध्ये नाराजी दिसत आहे. अंकिता अभिजीतला इनसिक्युरिटी असल्याचं म्हणते.

bigg boss marathi 5 ankita walawalkar said abhijeet sawant has insecurity because he had won big reality show | अभिजीतने निक्कीला "खिलाडी" म्हटल्याचं DP ला खुपलं, अंकिता म्हणाली, "त्याला insecurity आहे, म्हणून..."

अभिजीतने निक्कीला "खिलाडी" म्हटल्याचं DP ला खुपलं, अंकिता म्हणाली, "त्याला insecurity आहे, म्हणून..."

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा यंदाचा सीझन अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. या सीझनमध्ये आवाजाने सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारा गायक अभिजीत सावंतही सहभागी झाला आहे. अभिजीत त्याच्या तल्लख बुद्धीने आणि हुशारीने उत्तम गेम खेळत प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. पण, त्याची ही खेळी त्याच्या टीममधील इतर सदस्यांना मात्र रुचत नसल्याचं पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरातील एक नवा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर, धनंजय पोवार आणि पॅडी कांबळे गार्डन एरियामध्ये बसल्याचं दिसत आहे. अभिजीतबद्दल ते चर्चा करत आहेत. अभिजीतने खिलाडी म्हणून निक्कीचा उल्लेख केल्याने त्याच्या टीममधील सदस्यांमध्ये नाराजी दिसत आहे. धनंजय म्हणतो की "निक्कीचा दरारा आहे...तिला खिलाडी टॅग दिला". त्यावर अंकिता "अभिजीतनेच दिला...आपलंच नाणं खोटंय म्हटल्यानंतर काय आता" असं म्हणत हसायला लागते. मग धनंजय म्हणतो, "त्याला डोकंच नाहीये. अंकिताला देऊ शकला असता. पहिली कॅप्टन झालीये ती घरातली...खिलाडी म्हणून कोणीही सहमत झालं असतं". त्यानंतर पॅडी म्हणतो, "त्याला जपायचंय ते". 


नंतर धनंजय "तुम्हाला अजूनही त्याच्याबद्दल डाऊट आहे का?". मग अंकिता अभिजीतला इनसिक्युरिटी असल्याचं म्हणते. "तो एक मोठा शो जिंकून आला आहे. त्यामुळे त्याला ती इनसिक्युरिटी आहे. त्याला इथून काहीतरी जिंकून जायचंय. किंवा पुढे यायचंय", असं अंकिता म्हणत आहे. त्यावर पॅडी म्हणतो की "हो कारण इतक्या वर्षांनी त्याला ही संधी मिळाली आहे".

दरम्यान, पहिल्या आठवड्यात किर्तनकार पुरषोत्तम दादा पाटील यांनी घरातून एक्झिट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात निक्की तांबोळी, योगिता चव्हाण, पॅडी कांबळे, सूरज चव्हाण, निखिल दामले, घनश्याम दरवडे हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. पण, बिग बॉसने ट्विस्ट आणत कोणालाच घराबाहेर काढलं नाही. आता या आठवड्यात नवीन कॅप्टन आणि नॉमिनेशनचा टास्क रंगलेला पाहायला मिळेल. 
 

Web Title: bigg boss marathi 5 ankita walawalkar said abhijeet sawant has insecurity because he had won big reality show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.