'बिग बॉस'च्या घरात अंकिताची छोटा पुढारीला कानाखाली लगावण्याची भाषा, नेमकं घडलं तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 17:21 IST2024-08-13T17:21:08+5:302024-08-13T17:21:44+5:30
Bigg Boss Marathi Season 5 Contestants : आता बिग बॉसच्या घरातील एक नवा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. घरातील चिमुकल्या पाहुण्यांसोबत छोटा पुढारीदेखील सगळ्यांशी पंगा घेताना दिसत आहे.

'बिग बॉस'च्या घरात अंकिताची छोटा पुढारीला कानाखाली लगावण्याची भाषा, नेमकं घडलं तरी काय?
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनच्या तिसऱ्या आठवड्यात घरातील सदस्यांवर दोन चिमुकल्या पाहुण्यांना सांभाळण्याचा टास्क देण्यात आला आहे. या टास्कमध्ये दोन टीम पाडण्यात आल्या असून त्यांना बाळांना सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हा टास्क करताना बिग बॉसने सदस्यांना काही नियम दिले आहेत.
बिग बॉसने दिलेला हा टास्क पूर्ण करताना दोन्ही टीममध्ये काही प्रमाणात वाद झाल्याचं दिसत आहे. आता बिग बॉसच्या घरातील एक नवा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. घरातील चिमुकल्या पाहुण्यांसोबत छोटा पुढारीदेखील सगळ्यांशी पंगा घेताना दिसत आहे. यामुळे घरात दंगा होणार असल्याचं दिसत आहे. घनश्याम पॅडीबरोबर वाद घालताना व्हिडिओत पाहायला मिळत आहे. या नव्या प्रोमोमध्ये अंकिता आणि धनंजय घनश्यामबद्दल बोलत आहेत. अंकिता घनश्यामला म्हणते, "घन:श्यामला खरंच मला मारावंसं वाटत होतं...त्याच्या एका शब्दावरही मला विश्वास राहिलेला नाही. त्याला धावताना पाहून त्याच्या सणसणीत दोन कानाखाली द्याव्याशा वाटत होत्या".
दरम्यान, घरातील या पाहुण्यांना सांभाळण्याची आणि त्यांचं मनोरंजन करण्याची जबाबदारी घरातील सदस्यांवर आहे. या छोट्या पाहुण्यांचा सांभाळ करताना घरातील सदस्यांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांच्या नाकीनऊ आल्याचं दिसत आहे. या टास्कमध्ये आता कोणती टीम जिंकणार हे पाहणं रंजक असणार आहे.
'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक
वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण