बिग बॉसमध्ये पहिल्या आठवड्यात हे सहा सदस्य झाले नॉमिनेट! कोण जाईल घराबाहेर?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 10:16 AM2024-08-01T10:16:30+5:302024-08-01T10:16:49+5:30

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची पहिली नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण झाली असून सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत (bigg boss marathi 5)

bigg boss marathi 5 ankita walawalkar suraj chavan yogita chavan varsha usgaonkar nominate this week | बिग बॉसमध्ये पहिल्या आठवड्यात हे सहा सदस्य झाले नॉमिनेट! कोण जाईल घराबाहेर?

बिग बॉसमध्ये पहिल्या आठवड्यात हे सहा सदस्य झाले नॉमिनेट! कोण जाईल घराबाहेर?

बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनची पहिली नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. नॉमिनेशनची तोफ असं घरातलं पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडलं असून या कार्याअंती एकेक करुन घरातील सदस्यांनी सहा जणांना घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट केले. त्यामुळे या आठवड्यात घराबाहेर कोण जाणार आणि कोण सेफ होणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. चला तर आम्ही तुम्हाला सांगतो कोण सहा जण नॉमिनेट झाले आहेत.

हे सहा जण झाले नॉमिनेट

घरातील सदस्यांनी जास्तीत जास्त तोफेचा वापर केल्याने सहा सदस्य घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत. सूरज चव्हाण, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर, योगिता चव्हाण हे सहा जण या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी  नॉमिनेट झाले आहेत. आता या सहा जणांपैकी कोण घराबाहेर जाणार अन् कोण सेफ होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.



आजच्या भागात निक्की-आर्यामध्ये राडा

'बिग बॉस मराठी'चा नव्या प्रोमोमध्ये निक्की तांबोळी आणि आर्या जाधव एकमेकांसोबत मोठमोठ्याने भांडताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये आर्याला निक्कीचा चांगलाच राग आलेला दिसून येत आहे. आर्या निक्कीला "तुला घाबरायला पाहिजे",म्हणत धमकी देताना दिसत आहे. तर निक्की तिला "फट्टू" म्हणते. त्यावर निक्की तिला "वेडी" म्हणते. आर्या पुढे म्हणते,"मला शांत करायचं नाही". आर्या आणि निक्कीचा राग अनावर झाला आहे. त्यामुळे नॉमिनेशन टास्क दरम्यान आणखी रंगत येणार आहे. 

 

Web Title: bigg boss marathi 5 ankita walawalkar suraj chavan yogita chavan varsha usgaonkar nominate this week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.