"निक्की आणि मी भांडत असताना नेहमी बाजू घेशील...", वर्षाताईंनी दाखवला ठसका, अरबाज लावतोय मस्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 16:17 IST2024-09-09T16:14:57+5:302024-09-09T16:17:14+5:30
Bigg Boss Marathi 5: नेहमी वाद विवाद आणि तंट्याने गजबजलेल्या घरात खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे.

"निक्की आणि मी भांडत असताना नेहमी बाजू घेशील...", वर्षाताईंनी दाखवला ठसका, अरबाज लावतोय मस्का
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात रोज सदस्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने वाद होत असल्याचं दिसत आहे. पहिल्या दिवसापासूनच निक्की आणि वर्षाताईंमध्ये भांडण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. नेहमी वाद विवाद आणि तंट्याने गजबजलेल्या घरात खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओत वर्षाताई अरबाजची फिरकी घेताना दिसत आहेत. अरबाज वर्षाताईंकडे चिप्स मागत आहेत. वर्षाताई त्याला म्हणतात, "मला मस्का लाव. मी सगळ्यात सुंदर स्त्री आहे, असं म्हण". "ताई तुम्ही सगळ्यात सुंदर स्त्री आहात", असं अरबाज म्हणतो. त्यानंतर वर्षाताई त्याला म्हणतात की, "निक्की आणि मी भांडत असताना नेहमी माझी बाजू घेशील असं म्हण". त्यावर अरबाज मस्तीमध्ये "मी नेहमी तुमची आणि तिची बाजू घेणार ताई", असं वर्षाताईंना म्हणत आहे. या व्हिडिओमुळे घरातील सदस्यांमध्ये एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात छोटा पुढारी घनश्याम दरवडेचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. तर या आठवड्यात संग्राम चौगुले बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेणार आहे. संग्रामच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीमुळे पुन्हा घरातील समीकरणं बदलल्याचं पाहायला मिळणार आहे. घरात येताच संग्रामने अरबाज आणि निक्कीला टार्गेट केल्याचं पाहायला मिळत आहे.