Bigg Boss Marathi 5 : कॅप्टन सूरजने बाप्पाचे मानले आभार; रितेश भाऊनेही दिलाय खास सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 17:40 IST2024-09-07T17:39:55+5:302024-09-07T17:40:33+5:30
Bigg Boss Marathi 5 : आजच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ कॅप्टन सूरजचे अभिनंदन करणार आहे.

Bigg Boss Marathi 5 : कॅप्टन सूरजने बाप्पाचे मानले आभार; रितेश भाऊनेही दिलाय खास सल्ला
आज घराघरात गणपती बाप्पाचं आगमन झाले आहे. त्यामुळे आज भाऊचा धक्काही गणपती स्पेशल असणार आहे. आज सगळीकडे आनंदी वातावरण आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाने कुटुंब एकत्र येत असते. वेगवेगळ्या स्वभावाचे लोक एकत्र येतात. 'बिग बॉस मराठी'च्या घरातही वेगवेगळ्या स्वभावाचे लोक एकत्र आले आहेत. आजच्या भागात कॅप्टन सूरज बाप्पाचे आभार मानताना दिसणार आहे. तर भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख त्याला खास सल्ला देणार आहे.
आजच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ कॅप्टन सूरजचे अभिनंदन करणार आहे. त्यावर सूरज म्हणाला,"गणपती बाप्पा आणि माझ्या टीमने माझी इच्छा पूर्ण केली आहे. माझ्या टीमच्या पाठिंब्यामुळे मी कॅप्टन झालो आहे". त्यावर सूरजला सल्ला देत रितेश भाऊ म्हणाला,"सूरज या कॅप्टन पदाचा कॉन्फिडन्स घ्या. या आठवड्यात जसं बोलत होतात तसं बोलत राहा... काम करत राहा..स्टँड घ्या. कॅप्टन म्हणजे जबाबदारी आहे".
'बिग बॉस मराठी'च्या घराचा कॅप्टन सूरज झाल्यामुळे चाहते खूप खूश आहेत. नेटकऱ्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आजच्या भागात रितेश भाऊदेखील सूरजचं कौतुक करताना आणि त्याला आत्मविश्वास देताना दिसणार आहे.