कमी उंची म्हणून लोकांनी हिणवलं! 'बिग बॉस'च्या घरात छोटा पुढारी भावुक, म्हणाला- "माझ्या आईवडिलांना..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 11:50 AM2024-08-07T11:50:57+5:302024-08-07T11:52:32+5:30
Bigg Boss Marathi Season 5 Contestants : दमदार भाषणाने भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीचा बिग बॉसच्या घरातही दरारा पाहायला मिळत आहे. पण, कमी उंचीमुळे लोकांनी हिणवल्याचा खुलासा नुकताच बिग बॉसच्या घरात त्याने केला आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी ५' चा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. यंदाचा सीझन खऱ्या अर्थाने खास ठरला आहे. छोटा पुढारी घनश्याम दरवडेदेखील या सीझनमध्ये सहभागी झाला आहे. दमदार भाषणाने भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीचा बिग बॉसच्या घरातही दरारा पाहायला मिळत आहे. पण, कमी उंचीमुळे लोकांनी हिणवल्याचा खुलासा नुकताच बिग बॉसच्या घरात त्याने केला आहे.
बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत छोटा पुढारी धनंजय दादाबरोबर गार्डन एरियामध्ये बसून बोलताना दिसत आहे. धनंजयशी बोलताना तो भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. कमी उंची असल्यामुळे त्याला आणि त्याच्या आईवडिलांना अनेक संकंटांना सामोरं जावं लागलं आहे. याशिवाय समाजातील लोकांनीही त्याला हिणवल्याचं घनश्याम DP दादाशी बोलताना म्हणाला.
"माझ्या घरच्यांना म्हणायचे की तुमचा मुलगा काही करू शकत नाही. त्याची उंची नाही. आज तेच लोक म्हणत असतील की यांचा मुलगा बिग बॉसमध्ये गेलाय", असं छोटा पुढारी म्हणतो. यावेळी त्याला अश्रू अनावर झाल्याचंही दिसत आहे. त्यानंतर धनंजय त्याला धीर देत म्हणतो, "ज्याला शरीराची उंची मापता आली नाही. त्याला मनाची उंची काय मापता येणार".
दरम्यान, या दुसऱ्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील पहिलं कॅप्टन्सी कार्य पार पडलं आहे. या कॅप्टन्सी कार्यात कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरला बिग बॉसच्या घरातील यंदाच्या आठवड्याची कॅप्टन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. अंकिता वालावलकरला बिग बॉस मराठी ५चा पहिला कॅप्टन होण्याचा बहुमान मिळाला आहे. पण, अंकिता कॅप्टन होताच छोटा पुढारीने घरातील काम करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, हे पाहावं लागेल.