Bigg Boss Marathi 5: "आगाऊ नको, डांबरट नको...", छोटा पुढारीने घेतली फिरकी, लाजून लाल झाली निक्की

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 11:30 AM2024-08-02T11:30:15+5:302024-08-02T11:31:27+5:30

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्यात प्रेम फुलत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता तर घरातील सदस्यही निक्कीला वहिनी म्हणून हाक मारत आहेत. 

Bigg Boss Marathi 5 chota pudhari aka ghanshyam darvade sing dada mala ek vahini aan song for nikki tamboli watch video | Bigg Boss Marathi 5: "आगाऊ नको, डांबरट नको...", छोटा पुढारीने घेतली फिरकी, लाजून लाल झाली निक्की

Bigg Boss Marathi 5: "आगाऊ नको, डांबरट नको...", छोटा पुढारीने घेतली फिरकी, लाजून लाल झाली निक्की

Bigg Boss Marathi Season 5 : अतिशय वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणाऱ्या 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनमध्ये मात्र पहिल्या दिवसापासूनच प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्यात प्रेम फुलत असल्याचं पाहायला मिळत आहे. अरबाजने निक्कीसाठी टोमॅटोचं हार्टही बनवलं होतं. आता तर घरातील सदस्यही निक्कीला वहिनी म्हणून हाक मारत आहेत. 

बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये वैभव निक्कीला अरबाज कुठे आहे? असं विचारतो. त्यावर निक्की त्याला मला काय माहीत? असं उत्तर देते. त्यानंतर वैभव तिला मजेत म्हणतो, तुम्हाला नाही माहीत तर कोणाला माहीत वहिनी... त्यानंतर निक्की लाजून घरात जाते. तिच्यापाठोपाठ छोटा पुढारीदेखील येतो आणि म्हणतो- "वहिनीला वहिनी नाही म्हणणार तर काय म्हणणार?". मग घनश्याम संधीचा फायदा घेत दादा मला एक वहिनी आण हे गाणं म्हणत निक्कीची फिरकी घेतो. "गोरी गोरी पान, फुलासारखी छान...दादा मला एक वहिनी आण...पण, आगाऊ नको, डांबरट नको...चांगल्या मनाची वहिनी आण", असं गाणं घनश्याम म्हणतो. त्याचं गाणं ऐकून निक्कीदेखील आश्चर्यचकित होते. 


दरम्यान, बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमधील पहिल्या आठवड्यात अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, धनंजय पवार हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता यांच्यापैकी कोणाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपणार हे येत्या वीकेंडला कळेल. 

'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक 

वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण

Web Title: Bigg Boss Marathi 5 chota pudhari aka ghanshyam darvade sing dada mala ek vahini aan song for nikki tamboli watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.