छोटा पुढारी निक्कीनंतर अरबाजच्या पडतोय पाया, अंघोळीसाठी करतोय गयावया; मजेशीर व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 05:09 PM2024-08-23T17:09:35+5:302024-08-23T17:10:11+5:30

Bigg Boss Marathi Season 5 : भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या या छोटा पुढारीचा बिग बॉसच्या घरातील एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे. 

bigg boss marathi 5 chota pudhari requesting arbaaz patel for taking bath funny video | छोटा पुढारी निक्कीनंतर अरबाजच्या पडतोय पाया, अंघोळीसाठी करतोय गयावया; मजेशीर व्हिडिओ व्हायरल

छोटा पुढारी निक्कीनंतर अरबाजच्या पडतोय पाया, अंघोळीसाठी करतोय गयावया; मजेशीर व्हिडिओ व्हायरल

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरवडेची निक्कीच्या गँगबरोबर चांगलीच गट्टी जमल्याचं पाहायला मिळत आहे. निक्की, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर, वैभव चव्हाण या टीम A ला छोटा पुढारी सपोर्ट करताना दिसतो. टास्क आणि नॉमिनेशन प्रक्रियेतही छोटा पुढारी निक्कीच्या गँगच्या बरोबर असतो. वेळोवेळी छोटा पुढारी त्याचं मतंही मांडताना दिसतो. भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या या छोटा पुढारीचा बिग बॉसच्या घरातील एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे. 

कलर्स मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया पेजवरुन बिग बॉस मराठीच्या घरातील एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत अरबाज आणि घनश्याम वॉशरुममध्ये दिसत आहेत. अंघोळीसाठी घनश्याम अरबाजला विनवणी करत असल्याचंही पाहायला मिळत आहे. घनश्याम अरबाजला म्हणतो, "लवकर अंघोळीला जा म्हटलं तरी जात नाहीये". त्यावर अरबाज त्याला म्हणतो, "नाहीच जाणार...आता माझ्यानंतरच तू जायचं अंघोळीला". तेवढ्यात सूरज तिथे येत असल्याचं दिसत आहे. "तुमच्यामुळे वेळ वाया जातोय", असं सूरज म्हणतो. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही मजेशीर कमेंट केल्या आहेत. 


दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरात आता हळूहळू सदस्यांमधील समीकरणं बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे.या आठवड्यात अभिजीत सावंत, वैभव चव्हाण, इरिना रुडाकोव्हा आणि आर्या जाधव हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी थेट नॉमिनेट झाले आहेत. आता या आठवड्यात कोणाचा प्रवास संपतो, हे येत्या रविवारी कळेल. 

Web Title: bigg boss marathi 5 chota pudhari requesting arbaaz patel for taking bath funny video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.