घराचा कॅप्टन होण्यासाठी सदस्यांमध्ये चुरस, कोणाला तिकीट मिळणार? कोणाची बस सुटणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 10:29 AM2024-09-05T10:29:10+5:302024-09-05T10:30:46+5:30

Bigg Boss Marathi 5 : घराचा कॅप्टन होण्यासाठी सदस्यांमध्ये चुरस होणार आहे. बिग बॉसने घरातील सदस्यांना कॅप्टन्सी कार्य दिलं आहे.

bigg boss marathi 5 contestant fight for captaincy task who will win watch promo | घराचा कॅप्टन होण्यासाठी सदस्यांमध्ये चुरस, कोणाला तिकीट मिळणार? कोणाची बस सुटणार?

घराचा कॅप्टन होण्यासाठी सदस्यांमध्ये चुरस, कोणाला तिकीट मिळणार? कोणाची बस सुटणार?

Bigg Boss Marathi Season 5 : यंदाच्या आठवड्यात कॅप्टन असलेल्या वर्षा उसगावकर यांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळेच नॉमिनेशन टास्कनंतर आता घरात कॅप्टन्सी कार्य पार पडणार आहे. घराचा कॅप्टन होण्यासाठी सदस्यांमध्ये चुरस होणार आहे. बिग बॉसने घरातील सदस्यांना कॅप्टन्सी कार्य दिलं आहे. 

बिग बॉसच्या घरातून कॅप्टन्सी कंटेन्डरची बस सुटणार आहे. या बसचा प्रवासी होऊन सदस्यांना कॅप्टन्सी कार्यात भाग घ्यायचा आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. कॅप्टन होण्यासाठी घरातील सदस्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. अंकिता पॅडीला म्हणते, "पॅडी दादा गणपतीक गावी जायचा हं...तिकीट कन्फर्म हवी". त्यावर पॅडी तिला म्हणतो, "माझी तिकीट बुक हा". 


त्यानंतर कॅप्टन्सीवरुन अरबाज आणि घनश्याम एकमेकांना भिडल्याचंही दिसत आहे. "मी घनश्यामपेक्षा चांगली कॅप्टन्सी करू शकतो" असं अरबाज म्हणत आहे. त्यानंतर अभिजीत त्याला "घनश्याम कॅप्टन का नाही होऊ शकत?" असं विचारत आहे. आता बिग बॉसच्या घरातून निघालेल्या या बसमध्ये कोण सवार होणार? आणि कोणाला या बसचं तिकीट मिळणार हे पाहणं रंजनकारक असणार आहे. 

दरम्यान, या आठवड्यात एकूण ७ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. नॉमिनेशन प्रक्रियेत घरातील सदस्यांनी घनश्याम दरवडे, सूरज चव्हाण, आर्या जाधव, अभिजीत सावंत, अरबाज पटेल, निक्की तांबोळी, धनंजय पोवार यांना नॉमिनेट केलं आहे. गेल्या आठवड्यात वोटिंग लाइन्स बंद असल्यामुळे कोणताही सदस्य घराबाहेर गेला नाही. पण, या आठवड्यात मात्र एका स्पर्धकाचा प्रवास संपणार आहे. 
 

Web Title: bigg boss marathi 5 contestant fight for captaincy task who will win watch promo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.