"ठुकरा के मेरा प्यार..."; अरबाज-निक्कीच्या नात्यात दुरावा, घरातील सदस्यांनी घेतली फिरकी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 09:12 AM2024-08-28T09:12:16+5:302024-08-28T09:13:11+5:30

'जोडी की बेडी' या टास्कमध्ये निक्की आणि अभिजीतला एकत्र बेडीत अडकवल्यानंतर अरबाजचा पारा चढला. यावरुन निक्की आणि अरबाजमध्ये जोरदार भांडणही झाल्याचं पाहायला मिळालं. आता घरातील सदस्य निक्की आणि अरबाजची फिरकी घेताना दिसत आहेत.

bigg boss marathi 5 contestant sing thukra ke mera pyar song for arbaaz and nikki | "ठुकरा के मेरा प्यार..."; अरबाज-निक्कीच्या नात्यात दुरावा, घरातील सदस्यांनी घेतली फिरकी

"ठुकरा के मेरा प्यार..."; अरबाज-निक्कीच्या नात्यात दुरावा, घरातील सदस्यांनी घेतली फिरकी

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात निक्की तांबोळीच्या टीम A मध्ये फूट पडल्याचं दिसत आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने निक्कीसमोर टीम A ची पोलखोल केल्यानंतर आता त्यांच्यात वादाची ठिणगी पडली. निक्कीने टीम A बरोबर न खेळता स्वतंत्र खेळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निक्की आणि अरबाजच्या नात्यातही दुरावा आल्याचं पाहायला मिळालं. 'जोडी की बेडी' या टास्कमध्ये निक्की आणि अभिजीतला एकत्र बेडीत अडकवल्यानंतर अरबाजचा पारा चढला. 

यावरुन निक्की आणि अरबाजमध्ये जोरदार भांडणही झाल्याचं पाहायला मिळालं. अरबाजने घरातील वस्तूंची तोडफोडही केली. घरातील सदस्यही अरबाजला सपोर्ट करताना दिसून आले. पण, आता मात्र घरातील सदस्य निक्की आणि अरबाजची फिरकी घेताना दिसत आहेत. बिग बॉस मराठीच्या घरातील एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये निक्कीला सदस्य चिडवताना दिसत आहेत. निक्कीकडे बघून सूरज आणि आर्या "ठुकरा के मेरा प्यार...मेरा इन्तकाम देखेगी" हे गाणं बोलताना दिसत आहेत. त्यानंतर "मुझे छोडके गर तुम जाओगे बडा पछताओगे" हे गाणंही सदस्य बोलतात. हे ऐकून निक्की आणि अरबाजलाही हसू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.  


दरम्यान, अरबाजने भांडणात घरात तोडफोड केली, त्यामुळे बिग बॉसने त्याला शिक्षा सुनावली आहे. आता अरबाजला या आठवड्याच्या कॅप्टन्सी कार्यात सहभाग घेता येणार नाहीये. यंदाच्या आठवड्यात झालेल्या नॉमिनेशन प्रक्रियेत घरातील अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर, निक्की तांबोळी आणि अभिजीत सावंत हे सदस्य नॉमिनेट झाले होते. परंतु, या आठवड्यात वोटींग लाइन्स बंद असल्याने कोणीही घराबाहेर जाणार नाही. 
 

Web Title: bigg boss marathi 5 contestant sing thukra ke mera pyar song for arbaaz and nikki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.