Video: "सगळ्यात कमजोर खेळाडू म्हणजे घन:श्याम-वैभव"; महाराष्ट्राच्या प्रतिक्रिया वाचून सर्व थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 12:23 PM2024-08-18T12:23:01+5:302024-08-18T12:23:45+5:30

बिग बॉस मराठीच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्राची जनता सदस्यांबद्दल काय विचार करते, ते पाहायला मिळणार आहे (bigg boss marathi 5)

bigg boss marathi 5 contestants read comments of people of maharashtra riteish deshmukh | Video: "सगळ्यात कमजोर खेळाडू म्हणजे घन:श्याम-वैभव"; महाराष्ट्राच्या प्रतिक्रिया वाचून सर्व थक्क

Video: "सगळ्यात कमजोर खेळाडू म्हणजे घन:श्याम-वैभव"; महाराष्ट्राच्या प्रतिक्रिया वाचून सर्व थक्क

 'बिग बॉस मराठी'च्या नवीन सीझनमध्ये सध्या एकापेक्षा एक ट्विस्ट अँड टर्न बघायला मिळत आहेत. कालच भाऊच्या धक्क्यावर रितेशभाऊंनी घरातील सदस्यांना चांगलंच झापलं. यावेळी वैभव, निक्की, अरबाज यांना रितेशने चांगलंच फैलावर घेतलं. इतकंच नव्हे तर प्रत्येकाला रितेशभाऊने महाराष्ट्र तुमच्याबद्दल काय विचार करतोय, हेही दाखवलं. आता पहिल्यांदाच बिग बॉस मराठीच्या मंचावर लोकांच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स सदस्यांना वाचायला मिळणार आहेत.

वैभव-घनःश्याम कमजोर खेळाडू

बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणतोय,"मी तुम्हाला दाखवणार आहे तुमच्याबद्दल महाराष्ट्र काय बोलतोय ते". त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेच्या कमेंट्स वाचायला प्रत्येक सदस्य पुढे आलेले दिसून येतात. वैभव कमेंट वाचतो की,"सगळ्यात कमजोर दोन खेळाडू म्हणूजे घन:श्याम आणि वैभव". पुढे अभिजीत कमेंट वाचतो,"तुझ्यासारख्या पावडरवाल्याला लोळवला". अशाप्रकारे महाराष्ट्राच्या प्रतिक्रिया वाचून सर्वजण थक्क होतात.


डीपीने वाचली ही कमेंट, पुढे काय झालं?

पुढे डीपी अर्थात धनंजय पोवार त्याच्याबद्दलची कमेंट वाचतो की "निक्की गँगसोबत भिड". त्यावर स्पष्टीकरण देत डीपी म्हणतो,"अजून मी कोणासोबत भिडलेलोच नाही". एकंदरीतच आजच्या भागात सदस्यांना महाराष्ट्राला त्यांच्याविषयी वाटत असलेलं मत कळणार आहे. यामुळे घरात खेळ खेळणाऱ्या सदस्यांना त्यांच्याबद्दल महाराष्ट्राची जनता काय विचार करते, हे कळणार आहे. 

Web Title: bigg boss marathi 5 contestants read comments of people of maharashtra riteish deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.