नाष्ट्याला चमचमीत पदार्थांचा थाट, सदस्यांच्या तोंडाला सुटलं पाणी, पण...; बिग बॉसचा ट्विस्ट! बघा काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 01:42 PM2024-07-29T13:42:33+5:302024-07-29T13:43:17+5:30

बिग बॉस मराठी ५ मध्ये पहिल्याच दिवशी नाष्ट्याला एकापेक्षा एक स्वादिष्ट पदार्थांचा थाट रचण्यात आला. पण घरातील सदस्य मात्र वंचित. पाहा प्रोमो (bigg boss marathi 5)

bigg boss marathi 5 day 1 update restriction of breakfast on contestants | नाष्ट्याला चमचमीत पदार्थांचा थाट, सदस्यांच्या तोंडाला सुटलं पाणी, पण...; बिग बॉसचा ट्विस्ट! बघा काय घडलं?

नाष्ट्याला चमचमीत पदार्थांचा थाट, सदस्यांच्या तोंडाला सुटलं पाणी, पण...; बिग बॉसचा ट्विस्ट! बघा काय घडलं?

'बिग बॉस मराठी'चा नवीन सीझन कालपासून सुरु झालाय. घरातील सदस्यांचा पहिलाच दिवस त्यांच्यासाठी अनेक आव्हानांचा ठरणार आहे. 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांचा 100 दिवसांचा प्रवास सुरू झाला असून आता पहिल्या दिवसापासूनच त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या स्पर्धकांचा पहिल्या दिवशी ब्रेकफास्टचा लॅव्हिश थाट असला तरी हा ब्रेकफास्ट नक्की कोणाच्या नशिबात असणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आजचा एपिसोड पाहावा लागेल.

ब्रेकफास्टची मेजवानी पण कोणासाठी?

'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत,"गार्डन एरियामध्ये आपल्यासाठी एक लॅव्हिश ब्रेकफास्ट आयोजित केला आहे". 'बिग बॉस'ने लॅव्हिश ब्रेकफास्ट आयोजित केल्याने स्पर्धकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. घरातील सदस्यांसाठी 'बिग बॉस'ने गार्डन एरियामध्ये लॅव्हिश ब्रेकफास्टची मेजवानी ठेवलेली असते. दरम्यान छोटा पुढारीला काही दिसत नसल्याने अरबाज त्याला उचलतो.


छोटा पुढारीला दिसला स्वर्ग 

त्यावेळी वर्षा उसगावकर छोटा पुढारीला काय दिसलं विचारतात, तो म्हणतो,"स्वर्ग". त्यानंतर घराबाहेरच्या दोन अनोळखी व्यक्तींची घरात एन्ट्री होते. काहीही न बोलता त्यांच्याकडे असलेला एक पेपर हे अनोळखे व्यक्ती घरातील सदस्यांना दाखवतात. त्यावर  "Do NOT TOUCH" असं लिहिलेलं असतं". घरातील सदस्यांना भूक लागलेली असून समोर दिसत असलेल्या ब्रेकफास्टच्या लॅव्हिश थाटावर ताव मारता येईल का? हा ब्रेकफास्ट नक्की कोणाच्या नशिबात असेल? हे लवकरच समोर येईल.

Web Title: bigg boss marathi 5 day 1 update restriction of breakfast on contestants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.