"धनंजयला तुम्ही का दाखवत नाही?", DP दादाची पत्नी आणि आईचे 'बिग बॉस मराठी'वर गंभीर आरोप, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 10:56 AM2024-08-28T10:56:33+5:302024-08-28T10:57:31+5:30

Bigg Boss Marathi Season 5 : "बिग बॉसच्या एका तासाच्या एपिसोडमध्ये..." , DP दादाची पत्नी आणि आईचे 'बिग बॉस मराठी'वर आरोप

bigg boss marathi 5 dhananjay powar wife and mother alleged show team for not showing his footage | "धनंजयला तुम्ही का दाखवत नाही?", DP दादाची पत्नी आणि आईचे 'बिग बॉस मराठी'वर गंभीर आरोप, म्हणाल्या...

"धनंजयला तुम्ही का दाखवत नाही?", DP दादाची पत्नी आणि आईचे 'बिग बॉस मराठी'वर गंभीर आरोप, म्हणाल्या...

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पोवारही सहभागी झाला आहे. बिग बॉसच्या घरात DP त्याच्या स्वभावाने सगळ्यांची मनं जिंकून घेत आहे. चाहत्यांचाही धनंजयला फूल सपोर्ट असल्याचं पाहायला मिळत आहे. पण, धनंजयची पत्नी आणि आई यांनी बिग बॉस मराठीच्या टीमवर नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले आहेत. धनंजयचं फुटेज बिग बॉस दाखवत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 

धनंजयच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत "काल जान्हवीने धनंजयला सेफ केलं. तेव्हा त्याला सेफ करताना जान्हवी जनतेला म्हणाली की त्यांचा खेळ आहे. दिवसभर आम्ही गेम प्लॅनबद्दल चर्चा करत होतो. पण, ती चर्चा कुठे दाखवलीच नाही", असं धनंजय पोवारची पत्नी म्हणत आहेत. तर पुढे त्यांनी अंकिताने डीपीला नॉमिनेट केल्याबद्दलही खंत व्यक्त केली आहे. "अंकिताने डीपीला नॉमिनेट केलेलं मला पटलं नाही", असं त्या डीपीच्या आईला म्हणतात. त्यावर डीपीच्या आई म्हणतात, "मला तर अजिबातच पटलेलं नाही. खरं तर तिने वैभवमुळे धनंजयला नॉमिनेट केलं". त्यानंतर डीपीच्या पत्नी म्हणतात, "त्यांचा गेम सुधारावा म्हणून त्यांनी नॉमिनेट केलं, असं म्हणाल्या. पण, हे कारण मला पटलेलं नाही". 


याशिवाय धनंजयची आई आणि पत्नी या दोघींनीही बिग बॉसवर आरोपही केले आहेत. धनंजयचं फुटेज दाखवत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. डीपीच्या आई म्हणतात, "अंकिताने डीपीला नॉमिनेट केलेलं मला पटलेलं नाही. जनतेला पटलंय का? हे त्यांनी सांगावं. शिवाय जेव्हा धनंजय गेम कसा खेळायचा, त्याचं प्लॅनिंग सांगत असतो तेव्हा फोकस त्याच्यावर करतच नाहीत. त्याला दाखवतच नाहीत. ही काय भानगड आहे? अनसीन अनदेखा मध्ये दाखवतात मग बिग बॉसच्या घरात का दाखवत नाहीत?".  "एक एंटरटेनर म्हणून ते पुढे गेले आहेत. त्यांचं फूल एंटरटेनमेंट आहे. जे तु्म्ही अनसीन अनदेखामध्ये दाखवत आहात. पण, या एक तासाच्या एपिसोडमध्ये ते भाग तुम्ही का दाखवत नाही?", असा प्रश्न डीपीच्या पत्नीने उपस्थित केला आहे. शिवाय बिग बॉसने डीपीला दाखवलं पाहिजे, असंही त्या दोघींचं म्हणणं आहे. 

Web Title: bigg boss marathi 5 dhananjay powar wife and mother alleged show team for not showing his footage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.