"मला अजून एक आठवडा संधी द्यायला पाहिजे होती", 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडलेले पुरुषोत्तम पाटील असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 12:34 PM2024-08-12T12:34:45+5:302024-08-12T12:35:14+5:30

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : किर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यंदाच्या बिग बॉसमध्ये सहभागी झाले होते. पण, पहिल्याच आठवड्यात त्यांना घरातून बाहेर यावं लागलं. घरातून बाहेर आल्यानंतर त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

bigg boss marathi 5 eliminated purushottam dada patil wanted to stay one more week in house | "मला अजून एक आठवडा संधी द्यायला पाहिजे होती", 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडलेले पुरुषोत्तम पाटील असं का म्हणाले?

"मला अजून एक आठवडा संधी द्यायला पाहिजे होती", 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडलेले पुरुषोत्तम पाटील असं का म्हणाले?

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा यंदाचा सीझन खऱ्या अर्थाने खास आहे. यंदाच्या सीझनमध्ये कित्येक नवे चेहरे चाहत्यांना पाहायला मिळाले. किर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यंदाच्या बिग बॉसमध्ये सहभागी झाले होते. पण, पहिल्याच आठवड्यात त्यांना घरातून बाहेर यावं लागलं. घरातून बाहेर आल्यानंतर त्यांनी खंत व्यक्त केली आहे. 

बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमधील दुसरा आठवड्याचा भाऊचा धक्का नुकताच पार पडला. या आठवड्यात निक्की तांबोळी, योगिता चव्हाण, पॅडी कांबळे, सूरज चव्हाण, निखिल दामले, घनश्याम दरवडे हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. पण, बिग बॉसने ट्विस्ट आणत कोणालाच घराबाहेर काढलं नाही. आज कोणीच घराबाहेर जाणार नाही, असं म्हणत रितेशने सगळ्यांना सरप्राइज दिलं. त्यानंतर पहिल्या आठवड्यात घरातून बाहेर पडलेल्या पुरुषोत्तम दादा पाटील यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.


 

पुरुषोत्तम दादा पाटील यांनी या पोस्टमधून खंत व्यक्त केली आहे. "मला बिग बॉसच्या घरात अजून एक आठवडा संधी भेटली पाहिजे होती. तुम्हाला काय वाटतं अवश्य सांगा", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनीही त्यांना पुन्हा बिग बॉसच्या घरात बघण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक 

वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण
 

Web Title: bigg boss marathi 5 eliminated purushottam dada patil wanted to stay one more week in house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.