'उद्धवजी मिटींगमध्ये असताना माझ्यासाठी लपून..'; अभिजीत सावंतने सांगितला 'इंडियन आयडॉल'वेळचा खास किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 15:09 IST2024-08-31T15:06:53+5:302024-08-31T15:09:53+5:30
बिग बॉस मराठीचं घर गाजवत असलेल्या अभिजीत सावंतने उद्धव ठाकरेंबद्दल खास किस्सा सांगितला आहे (abhijeet sawant, bigg boss marathi 5)

'उद्धवजी मिटींगमध्ये असताना माझ्यासाठी लपून..'; अभिजीत सावंतने सांगितला 'इंडियन आयडॉल'वेळचा खास किस्सा
सध्या बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये अभिजीत सावंतची चांगलीच चर्चा आहे. अभिजीत सावंत त्याच्या उत्कृष्ट खेळाने बिग बॉस मराठीचं घर गाजवतोय. अभिजीत घरातील अन्यायाविरुद्ध उभा राहतोय, याशिवाय जो कोणी त्याच्याशी भांडायला येईल त्याला अभिजीत सडेतोड उत्तर देतोय. अशातच बिग बॉस मराठीचं घर गाजवणाऱ्या अभिजीतने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंबद्दल खास किस्सा सांगितलाय.
अभिजीतसाठी उद्धव ठाकरेंनी केलेलं वोटिंग
अभिजीत सावंतने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत किस्सा सांगितला की, "उद्धवजींनी मला एक अनुभव सांगितलाय. त्यांची मिटिंग वगैरे चालू असायची. मीटींगमध्ये त्यांची इतरांसोबत चर्चा चालू आहे आणि त्यांनी माझ्यासाठी असा फोन काढून वोट केलंय. समोर कोणीतरी बोलतंय आणि ते मला मिटींगमध्ये लपून वोट करायचे. पण असं प्रेशर वगैरे त्यांनी कधी टाकलं नाही. कारण त्या शोमध्ये तीन मराठी गायक होते. माझ्यापेक्षा राहूल वैद्यला स्टार वॅल्यू जास्त होती. पण कधी असं प्रेशर नाही."
अभिजीत सावंत बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये
अभिजीत सावंत बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये सहभागी आहे. अभिजीतने 'इंडियन आयडॉल'चं विजेतेपदही पटकावलं आहे. अभिजीत सावंत सध्या बिग बॉसच्या घरात शांतीत क्रांती करताना दिसतोय. अभिजीत सावंतचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं आहे त्याला दोन मुली आहेत. इंडियन आयडॉलच्या फिनालेमध्ये 'मोहब्बते लुटाऊंगा' हे अभिजीतने गायलेलं गाणं आजही सर्वांच्या आवडीचं आहे.