"आपली पायरी आपण...", 'बिग बॉस' गाजवल्यानंतर कोल्हापुरचा ढाण्या वाघ परतला कामावर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 12:15 IST2024-10-11T12:14:44+5:302024-10-11T12:15:04+5:30
'बिग बॉस मराठी'च्या घरात ठसकेबाज कोल्हापूरी वाणी तसेच विनोदी शैलीमुळे धनंजय चर्चेत आला.

"आपली पायरी आपण...", 'बिग बॉस' गाजवल्यानंतर कोल्हापुरचा ढाण्या वाघ परतला कामावर!
Dhananjay Powar : कलर्स मराठी वाहिनीवरील वादग्रस्त पण तितकाच चर्चिला जाणारा कार्यक्रम म्हणजे 'बिग बॉस' (Bigg Boss) आहे. 'बिग बॉस'च्या घरात कोल्हापूरचा लाडका डीपी फेम धनंजय पोवार (Dhananjay Powar) स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. अशातच या 'बिग बॉस' मधून बाहेर पडल्यानंतर त्यानं गाव गाठलं आहे. जवळपास अडीच महिन्यानंतर धनंजय पोवार हा पुन्हा कामावर परतला आहे.
धनंजय पोवारचं स्वतःचं फर्निचरचं दुकान आहे. या दुकानात जाऊन तो पुन्हा कामाला लागला आहे. याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये धनंजय दुकानात जाण्यापूर्वी पाया पडताना दिसत आहे. यानंतर तो दुकानातील काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधतो. "कितीही मोठी उंची प्राप्त होऊदे आपली पायरी आपण सोडायची नाही", असं कॅप्शन लिहिलं आहे.
'बिग बॉस'च्या घरात कोल्हापूरी अंदाजाने धनंजय पोवारने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ठसकेबाज कोल्हापूरी वाणी तसेच विनोदी शैलीमुळे धनंजय चर्चेत आला होता. धनंजय हा टॉप 4 मध्ये जाणारा स्पर्धक होता. धनंजय हा प्रसिद्ध रीलस्टार (Famous Reel Star) आहे. धनंजय पवार विवाहीत असून त्यांच्या पत्नीचं नाव कल्याणी पवार (Kalyani Powar) असे आहे. धनंजय व कल्याणीला दोन गोड मुलं आहेत.