डीजे, बॅनर अन्... धनंजय पोवारच्या स्वागतासाठी सजली कोल्हापूर नगरी; खास वडिलांनी केली व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 05:03 PM2024-10-09T17:03:45+5:302024-10-09T17:07:25+5:30
धनंजय पोवारच्या स्वागतासाठी कोल्हपुरकरांनी जंगी तयारी केल्याची पाहायला मिळते आहे.
Dhananjay Powar : 'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये ७० दिवस राहिल्यानंतर धनंजय पोवार त्याच्या मुळगावी निघाला आहे. जवळपास अडीच महिन्यानंतर तो त्याच्या घरी परतणार आहे. सर्वांचा लाडका असलेल्या डीपी दादाच्या स्वागतासाठी कोल्हपुरकरांनी जंगी तयारी केल्याची पाहायला मिळते आहे. यामध्ये धनंजयचे वडील आवर्जून लक्ष देत असल्याचं पाहायला मिळतंय. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घरात ठसकेबाज कोल्हापूरी वाणी तसेच विनोदी शैलीमुळे धनंजय चर्चेत आला. अशातच 'बिग बॉस' मधून बाहेर पडल्यानंतर त्यानं गावाच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. दरम्यान, आपल्या लेकाच्या स्वागताकरिता डीपीचे वडील मैदानात उतरलेले दिसत आहेत. धनंजयने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये धनंजय पोवारच्या स्वागतासाठी कोल्हापूर नगरी सजवली गेली आहे. मोठा डीजे सेटअप तसेच बॅनर लावून डीपीचे वडील लेकाचं स्वागत करण्यासाठी तयारी करत आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील भावुक झाले आहेत. बाप-लेकाच्या नात्याची महती सांगताना नेटकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने म्हटलंय, "वडिलांचं मन जिंकल भावानं, ट्रॉफी कशाला पाहिजे... "तर आणखी एका यूजरने "कळत नसत ते बापाचं प्रेम..." असं लिहून त्याची प्रतिक्रिया दिली आहे.