VIDEO: लेट पण थेट! केक कटिंग अन् झापुक झुपूक डान्स; सूरजच्या वाढदिवशी वैभवने केलं जंगी सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 11:56 AM2024-10-22T11:56:14+5:302024-10-22T11:59:48+5:30

'बिग बॉस' च्या घरातून (Bigg Boss Marathi)  बाहेर पडताच गुलिगत किंग सूरज चव्हाणला (Suraj Chavan) संपूर्ण महाष्ट्रातील जनतेचं प्रेम मिळतंय.

bigg boss marathi 5 fame vaibhav chavan had a grand celebration on suraj chavan birthday video viral | VIDEO: लेट पण थेट! केक कटिंग अन् झापुक झुपूक डान्स; सूरजच्या वाढदिवशी वैभवने केलं जंगी सेलिब्रेशन

VIDEO: लेट पण थेट! केक कटिंग अन् झापुक झुपूक डान्स; सूरजच्या वाढदिवशी वैभवने केलं जंगी सेलिब्रेशन

Vaibhav Chavan Video : 'बिग बॉस मराठी'तून(Bigg Boss Marathi)  बाहेर पडताच गुलिगत किंग सूरज चव्हाणला(Suraj Chavan) संपूर्ण महाष्ट्रातील जनतेचं प्रेम मिळतंय. रिलस्टार ते बिग बॉसच्या घरात प्रवेश करणाऱ्या सूरजने आपल्या साध्याभोळ्या स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकली. दरम्यान, १९ सप्टेंबरला सूरजने त्याच्या वाढदिवशी मुंबईत येऊन केदार शिंदेंची भेट घेतली. सूरजला वाढदिवसानिमित्त पॅडी कांबळे अंकिता वालावलकर शिवाय 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात  सहभागी झालेल्या इतर स्पर्धकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. अशातच वैभव चव्हाणने सोशल मीडियावर सूरज चव्हाणच्या बर्थडे सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याने वाढदिवसाच्या निमित्ताने खास सरप्राइज दिलंय.


सूरच्या वाढिवसाचं वैभव चव्हाणने जंगी सेलिब्रिशेन केल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट शेअर करत त्याने सूरज चव्हाणला शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये वैभवने लिहंलंय, "सूरज भावा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लेट पण थेट! तुला कायम सगळ्यांनी असंच खांद्यावर उचलून धरावं आणि तू खूप यशस्वी हो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
बाकी आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोतच . जय शिवराय!"

व्हिडीओमध्ये वैभव त्याच्या मित्र मंडळींसह सूरजच्या वाढदिवसाची सगळी व्यवस्था केली आहे. केक कटिंग तसेच झापूक झुपूक स्टाईमध्ये डान्स करून त्यांनी हा व्हिडीओ शूट केल्याचं पाहायला मिळतंय. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांची कौतुकाचा वर्षाव केला आहे. शिवाय सूरज चव्हाणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Web Title: bigg boss marathi 5 fame vaibhav chavan had a grand celebration on suraj chavan birthday video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.