Bigg Boss Marathi 5 : "निक्कीला तूच घराबाहेर काढू शकतेस", कोकण हार्टेड गर्लला चाहत्यांचा फूल सपोर्ट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 12:39 PM2024-08-01T12:39:17+5:302024-08-01T12:39:42+5:30

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : अंकिताला दुसऱ्याच दिवशी बिग बॉसच्या घरात रडू कोसळलं. निक्की तांबोळीमुळे अंकिताला अश्रू अनावर झाले. पण, चाहत्यांचा मात्र अंकिताला फूल सपोर्ट असल्याचं दिसत आहे. 

Bigg Boss Marathi 5 fans support kokan hearted girl after ankita walawalkar cry because of nikki tamboli in house | Bigg Boss Marathi 5 : "निक्कीला तूच घराबाहेर काढू शकतेस", कोकण हार्टेड गर्लला चाहत्यांचा फूल सपोर्ट, म्हणाले...

Bigg Boss Marathi 5 : "निक्कीला तूच घराबाहेर काढू शकतेस", कोकण हार्टेड गर्लला चाहत्यांचा फूल सपोर्ट, म्हणाले...

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी ५'ला नुकतीच सुरुवात झाली असून पहिल्या दिवसापासूनच हा सीझन रंगतदार झाल्याचं पाहायला मिळत आहे. या सीझनमध्ये कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरला पाहून चाहतेदेखील आश्चर्यचकित झाले होते. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच होता. पण, अंकिताला मात्र दुसऱ्याच दिवशी बिग बॉसच्या घरात रडू कोसळलं. निक्की तांबोळीमुळे अंकिताला अश्रू अनावर झाले. पण, चाहत्यांचा मात्र अंकिताला फूल सपोर्ट असल्याचं दिसत आहे. 

पहिल्या आठवड्याच्या नॉमिनेशन टास्कमध्ये निक्कीने अंकिताला त्रास दिल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर अंकिता रडल्याचंही दिसलं होतं. बिग बॉसच्या घरात अंकिताला रडताना पाहून चाहत्यांना मात्र वाईट वाटत आहे. अंकिताच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिला पाठिंबा दर्शवला आहे. 

"तू रडू नको खेळतांना, ते बाहेर इले की मारूया", "सुरवातीला ठिक आहे रडणं...पण निक्कीला तूच बाहेर काढू शकतेस.....निक्कीला माहितीये की अंकिता आणि वर्षा मॅम स्ट्राँग आणि फेमस आहेत. तर तिने सुरुवातच ह्या दोघींपासून केली", असं काहींनी म्हटलं आहे. 

दरम्यान, बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमधील पहिल्या आठवड्यात अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, धनंजय पवार हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता यांच्यापैकी कोणाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपणार हे येत्या वीकेंडला कळेल. 

'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक 

वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण

Web Title: Bigg Boss Marathi 5 fans support kokan hearted girl after ankita walawalkar cry because of nikki tamboli in house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.