Bigg Boss Marathi : घरात रंगणार पहिला कॅप्टन्सी टास्क! कॅप्टन्सीच्या बुलेट ट्रेनचा कोण होणार सवारी? सदस्यांमध्ये रस्सीखेच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 09:18 AM2024-08-06T09:18:40+5:302024-08-06T09:19:21+5:30
Bigg Boss Marathi Season 5 Contestants : यंदाच्या सीझनमधील पहिल्या कॅप्टन्सी कार्यासाठी बुलेट ट्रेनचा टास्क होणार आहे. या बुलेट ट्रेनचा सवारी होऊन घराचा कॅप्टन होण्यासाठी सदस्यांमध्ये रस्सीखेच होणार आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठी ५ चा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. पहिल्या आठवड्यानंतर आता घरातील समीकरणंही हळूहळू बदलायला सुरुवात झाली आहे. या दुसऱ्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील पहिलं कॅप्टन्सी कार्य पार पडणार आहे. घरातील सदस्यांमध्ये यंदाच्या सीझनचा पहिला कॅप्टन होण्यासाठी चढाओढ झाल्याचं पाहायला मिळणार आहे.
यंदाच्या सीझनमधील पहिल्या कॅप्टन्सी कार्यासाठी बुलेट ट्रेनचा टास्क होणार आहे. या बुलेट ट्रेनचा सवारी होऊन घराचा कॅप्टन होण्यासाठी सदस्यांमध्ये रस्सीखेच होणार आहे. बिग बॉस मराठी ५मधील पहिल्या वहिल्या कॅप्टन्सी टास्कचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये घराचा कॅप्टन होण्यासाठी टीम A आणि टीम B मधील सदस्यांमध्ये स्पर्धा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. या टास्कदरम्यान अरबाज आणि अभिजीतमध्येही जोरदार वाद होणार असल्याचं दिसत आहे. बिग बॉसमध्ये भाऊच्या धक्क्यावर घरातील सदस्यांमध्ये दोन गट पाडण्यात आले होते. या दोन्ही टीममधील सदस्यांना बहुमताने निर्णय घेत त्यांच्या टीममधील तीन सदस्यांना कॅप्टन्सीच्या शर्यतीतून या सदस्यांना बाद करायचं होतं. त्यामुळे या आठवड्याच्या कॅप्टन्सी कार्यातून योगिता चव्हाण, धनंजय पोवार, निखिल दामलो, वर्षा उसगावकर, सूरज चव्हाण हे सदस्य बाद झाले आहेत.
दरम्यान, 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनमधील पहिल्या आठवड्यात अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, धनंजय पवार, पुरुषोत्तमदादा पाटील हे सदस्य नॉमिनेट झाले होते. त्यांच्यापैकी किर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे. पुरुषोत्तम दादा पाटील हे यंदाच्या सीझनमधील बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणारे पहिले स्पर्धक ठरले आहेत.
'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक
वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण