Bigg Boss Marathi 5: बिग बॉसने पहिल्याच दिवशी तोंडचं पाणी पळवलं, स्पर्धकही झालेत शॉक; नक्की झालं काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 10:19 AM2024-07-29T10:19:49+5:302024-07-29T10:20:37+5:30
Bigg Boss Marathi 5: घरातील मंडळींचा पहिला प्रोमो समोर आला आहे.
Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला काल दणक्यात सुरुवात झाली. रितेश देशमुखचं होस्टिंग आणि १६ स्पर्धकांची घरात एन्ट्री झाली. एकूणच या सीझनमध्ये खूप धमाल येणार हे नक्की. इन्फ्लुएन्सर्स ते टीव्ही कलाकार, गायक, पुढारी, फिल्म स्टार, फॉरेनर असे वेगवेगळे लोक एका घरात आले आहेत. घरातील मंडळींचा पहिला प्रोमो समोर आला आहे.
बिग बॉसच्या या नव्या सीझनमध्ये यंदा एक डिलेमा होता. रितेशने याबद्दल प्रत्येक स्पर्धकाला समजावून सांगितलं आणि दोन पर्याय दिले होते. त्यातला एक पर्याय निवडून स्पर्धकांना घरात प्रवेश करायचा होता. काही स्पर्धकांनी १० हजारची bb करन्सी घेतली तर काहींनी आपल्या आवडत्या वस्तू घेतल्या. आता ज्यांनी आवडत्या वस्तू घेतल्या त्यांना घरात काय महागात पडणार हे स्पष्ट होणार आहे. कारण यंदा बिग बॉसमध्ये काहीच मोफत मिळणार नाहीए. बेडरुम, किचन, बाथरुम किंवा स्वीमिंग पूल, अगदी पिण्याचं पाणी असो किंवा अन्न सगळ्यासाठी स्पर्धकांना पैसे द्यावे लागणार आहेत. याची झलक नुकतीच समोर आली आहे. कारण पहिल्याच स्पर्धकांना अंघोळीला पाणीच नाहीए. बिग बॉसने त्यांचं तोंडचं पाणीच पळवलं आहे.
आता फक्त घरातलं पाणी गेलंय थोड्याच वेळात सर्वांच्या तोंडचं पाणीही पळणार अशी ताकीदच बिग बॉसने स्पर्धकांना दिली आहे. हा नवीन प्रोमो पाहून लक्षात आलंच असेल की यंदा स्पर्धकांना घरात राहण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.
१६ स्पर्धक कोण?
बिग बॉस मराठी 5 मध्ये सहभागी झालेले १६ स्पर्धक - वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, पुरुषोत्तम पाटील, धनंजय पोवार, आर्या जाधव आणि सूरज चव्हाण.