Bigg Boss Marathi 5: 'कोकण हार्टेड' गर्लच्या बहिणींना पाहिलंत का? अंकिताची रक्षाबंधननिमित्त खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 11:26 AM2024-08-19T11:26:43+5:302024-08-19T11:28:26+5:30

Ankita Walawalkar : बिग बॉसच्या घरात सोशल मीडिया इन्फ्ल्युन्सर म्हणून प्रसिद्ध असलेली कोकण हार्टेड गर्ल म्हणजे अंकिता वालावलकर सहभागी झाली आहे. बिग बॉसमुळे ती सध्या चर्चेत आहे.

Bigg Boss Marathi 5: Have you seen the 'Kokan Hearted' girl's sisters? Ankita's special post on the occasion of Raksha Bandhan | Bigg Boss Marathi 5: 'कोकण हार्टेड' गर्लच्या बहिणींना पाहिलंत का? अंकिताची रक्षाबंधननिमित्त खास पोस्ट

Bigg Boss Marathi 5: 'कोकण हार्टेड' गर्लच्या बहिणींना पाहिलंत का? अंकिताची रक्षाबंधननिमित्त खास पोस्ट

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दिवसेंदिवस हा शो मनोरंजक होताना दिसत आहे. घरात मैत्री, वाद आणि भांडणं पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात सोशल मीडिया इन्फ्ल्युन्सर म्हणून प्रसिद्ध असलेली कोकण हार्टेड गर्ल म्हणजे अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) सहभागी झाली आहे. बिग बॉसमुळे ती सध्या चर्चेत आहे. दरम्यान आज रक्षाबंधन निमित्त अंकिताने बहिणींसोबतचे फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे.

अंकिता वालावलकरने बहिणीसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, आज रक्षाबंधन. लहानपणी भाऊ नाही म्हणून मांजरांना राखी बांधत बांधत मोठे झालो. गावात खूप आतमध्ये राहतो त्यामुळे कोणी भाऊ असे रक्षाबंधनला आलेच नाहीत. आपण खूप भांडतो पण मी मोठी म्हणून आई कायम मला सांगते “लक्ष ठेव हा ग,बहिणी भांडतात पण विसरू नका हा एकमेकींना”.


तिने पुढे लिहिले की, आज मी बिग बॉसमध्ये जरी असले तरी तुम्हाला मिस करत असेन. तुम्हाला काही कमी पडू नये अशी व्यवस्था करून आलेय. काळजी घ्या. ताईचे पैसे संपतील कसा ऑर्डर करू असा विचार करुन मन मारून राहू नका. जे वाट्टेल ते मागवून खा. भांडू नका. रडू नका. लवकरच येते. तुमची, ताई.

Web Title: Bigg Boss Marathi 5: Have you seen the 'Kokan Hearted' girl's sisters? Ankita's special post on the occasion of Raksha Bandhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.