भारतीय नसूनही एकादशीचे उपवास करते इरिना, 'बिग बॉस'च्या घरात परदेशी गर्लचा खुलासा, म्हणाली- "मी ११ दिवस..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 06:07 PM2024-07-31T18:07:39+5:302024-07-31T18:08:18+5:30

Bigg Boss Marathi Season 5 contestants : एकादशीचे उपवास करत असल्याचा खुलासा नुकताच तिने 'बिग बॉस मराठी'च्या घरात केला आहे. आर्याशी बोलताना इरिनाने ११ दिवस एकादशीचा उपवास करत असल्याचं सांगितलं.

bigg boss marathi 5 irina rudakova revealed that she used to do fast of ekadashi | भारतीय नसूनही एकादशीचे उपवास करते इरिना, 'बिग बॉस'च्या घरात परदेशी गर्लचा खुलासा, म्हणाली- "मी ११ दिवस..."

भारतीय नसूनही एकादशीचे उपवास करते इरिना, 'बिग बॉस'च्या घरात परदेशी गर्लचा खुलासा, म्हणाली- "मी ११ दिवस..."

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन नुकताच सुरू झाला आहे. यंदाच्या सीझनमध्ये बिग बॉसकडून अनेक सरप्रायजेस चाहत्यांना मिळत आहेत. पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरात परदेशी गर्लने एन्ट्री घेतली आहे. परदेशी गर्ल इरिना रुडाकोवाच्या एन्ट्रीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. तोडकं मोडकं मराठी बोलणाऱ्या इरिनाला 'बिग बॉस मराठी'मध्ये का घेतलं? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण, बिग बॉसच्या घरात जाताच इरिनाने चाहत्यांचा हा गैरसमज दूर केला. 

इरिना केवळ मराठी बोलतच नाही तर मराठी संस्कृतीही जपत असल्याचं समोर आलं आहे. एकादशीचे उपवास करत असल्याचा खुलासा नुकताच तिने 'बिग बॉस मराठी'च्या घरात केला आहे. आर्याशी बोलताना इरिनाने ११ दिवस एकादशीचा उपवास करत असल्याचं सांगितलं. "मी फक्त पाण्यावर ३ दिवस उपवास करते. दोन दिवस थोडासा त्रास होतो. पण, नंतर त्रास होत नाही. मी एकादशीचाही उपवास करते", असं म्हणते. त्यानंतर आर्या बिग बॉसच्या कॅमेऱ्यात बघून म्हणते की "ही इकडची नसूनही एकादशीचे ११ दिवसाचे उपवास ठेवते.वाह". 


'बिग बॉस मराठी५'च्या घरात पहिल्या दिवसापासूनच सदस्यांनी त्यांचा खेळ दाखवायला सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी घरातील सदस्यांनी इरिनाला निर्णय क्षमतेचा अभाव असल्याच्या टास्कमध्ये नॉमिनेट केलं. आता बिग बॉसच्या घरात पहिला नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. आता यामध्ये कोणते स्पर्धक नॉमिनेट होतात, हे पाहणं रंजनकारक असणार आहे. 

कोण आहे इरिना रुडाकोवा?

इरिना ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तर तिने योग अभ्यासातही ती पारंगत आहे. 'छोटी सरदारनी' या कलर्स च्या टिव्ही शो मध्ये तिने अभिनय केला आहे. IPL 2024 मध्ये तिने चिअर लीडर म्हणून ही आपल्या डान्स चा जलवा दाखवून दिला आहे. बिग बॉस मराठी 5 हा इरिना हीचा पहिला रिॲलिटी शो आहे. इरिनाचे इन्स्टाग्रामवर 154k फॉलोअर्स आहेत. 
 

Web Title: bigg boss marathi 5 irina rudakova revealed that she used to do fast of ekadashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.