"जान्हवीला सोडून घरात बाकीचे मूर्ख, निर्लज्ज...", वर्षा उसगावकरांचा अपमान केल्यानंतर भडकली मराठी अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 12:52 PM2024-08-10T12:52:55+5:302024-08-10T12:53:16+5:30
Bigg Boss Marathi Season 5 Contestants : टास्कदरम्यान जान्हवी किल्लेकरची वर्षा उसगावकरांशी बोलताना जीभ घसरली होती. आता पुन्हा तिने त्यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्य बिग बॉसच्या घरात केली आहेत. यावरुन मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी संताप व्यक्त केला आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. पण, यंदाच्या सीझनमध्ये घरातील काही सदस्यांकडून वारंवार वर्षा उसगावकर यांचा अपमान होतो आहे. गेल्या आठवड्यात निक्कीने वर्षा ताईंचा अपमान केल्यानंतर रितेश देशमुखने तिला खडे बोल सुनावले होते. पण, त्यानंतरही घरातील काही सदस्यांकडून त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत आहे. टास्कदरम्यान जान्हवी किल्लेकरची वर्षा उसगावकरांशी बोलताना जीभ घसरली होती. आता पुन्हा तिने त्यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्य बिग बॉसच्या घरात केली आहेत. यावरुन मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी संताप व्यक्त केला आहे.
कालच्या भागात जान्हवी आणि वर्षा उसगावकर यांच्यात बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. जान्हवी आर्याला उद्देशून निर्लज्ज असं म्हणाली. तेव्हा वर्षा उसगावरकर "निर्लज्जम समर्पयामी" असं म्हणाल्या. हे ऐकताच जान्हवी वर्षाताईंवर बरसली. "ताई मी तुमचा पहिल्या दिवसापासून रिस्पेक्ट करत आलीय. माझ्या नादी लागू नका. पोरं बसतात तिथे तुम्ही केस उडवत येता. तुमची घाणेरडी ॲक्टिंग मला नका दाखवू," असं ती म्हणाली. यावरुन सुरेखा कुडची यांनी पोस्ट शेअर केली आहे.
पोस्टमध्ये त्या म्हणतात, "आजचा एपिसोड पाहिला...पॅडीला हार्ट नाही दिलं, हे जरा चुकीचं नाही वाटलं का? असो पण सूरज...वाह तू म्हणालास की आईची कमी भासते. मुलांना जन्म दिल्यानंतर आई गेली तर त्या मुलांना आईचं प्रेम मिळत नाही. मी समजू शकते तुझ्या भावना...तुझं बोलणं ऐकत असताना तिथे येऊन तुला मायेनं जवळ घ्यावं असं वाटलं...मन जिंकलंस तू आज...कायम असाच राहा आणि खूश राहा".
जान्हवीसाठी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, "जान्हवी की कोण आहे तिला विजयी घोषित करा...कारण घरात तिला सोडून बाकी मुर्ख, बेअक्कल, निर्लज्ज, बिनडोक आहेत...सगळ्यांना ती घराबाहेर काढणार म्हणते तिला विशेष अधिकार दिलेत का बिग बॉसने? नादी लागू नका, खोटारड्या, पोरांसमोर केस उडवत येणं, घाणेरडी अॅक्टिंग, घाणेरडं तोडं, ओव्हर अॅक्टिंग, पुरस्कार देणाऱ्याला पच्छाताप होत असेल वर्षा उसगावकरला का घेतलं म्हणून...अशी भाषा चालते? मराठी माणूस ते खपवून घेईल?".