'बिग बॉस मराठी'च्या मंचावर पहिल्यांदाच अवतरणार बॉलिवूडची क्वीन, कंगना रणौत श्रेयस तळपदेसह लावणार हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 11:41 AM2024-08-25T11:41:11+5:302024-08-25T11:42:42+5:30

Bigg Boss Marathi Season 5 : कंगना रणौत आणि श्रेयस तळपदे यंदाच्या भाऊच्या धक्क्यावर हजेरी लावणार आहेत. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. 

bigg boss marathi 5 kangana ranaut and shreyas talpade emergency movie promotion | 'बिग बॉस मराठी'च्या मंचावर पहिल्यांदाच अवतरणार बॉलिवूडची क्वीन, कंगना रणौत श्रेयस तळपदेसह लावणार हजेरी

'बिग बॉस मराठी'च्या मंचावर पहिल्यांदाच अवतरणार बॉलिवूडची क्वीन, कंगना रणौत श्रेयस तळपदेसह लावणार हजेरी

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन खऱ्या अर्थाने खास ठरत आहे. पहिल्या दिवसापासूनच चाहत्यांना अनेक सरप्रायजेस मिळत आहेत. गेल्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार खेल खेल मे सिनेमाच्या प्रमोशनसाठी आला होता. आता यंदा बॉलिवूडची क्वीन बिग बॉस मराठीच्या मंचावर अवतरणार आहे. कंगना रणौत आणि श्रेयस तळपदे यंदाच्या भाऊच्या धक्क्यावर हजेरी लावणार आहेत. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. 

कंगना रणौत आणि रितेश देशमुख त्यांच्या आगामी इमर्जन्सी या सिनेमाच्या निमित्ताने बिग बॉस मराठीमध्ये येत आहेत. प्रोमोमध्ये श्रेयस आणि कंगना घरातील सदस्यांची फिरकी घेताना दिसत आहेत. श्रेयस वर्षा ताईंना "झपाटलेला" सिनेमाचं नाव देत घरातील एका व्यक्तीचं नाव घेण्यास सांगतो. त्यावर वर्षा ताई वैभव चव्हाणचं नाव घेतात. त्यानंतर वैभवला झपाटलेला सिनेमातील तात्याविंचूचा डायलॉग म्हणून दाखवण्यास सांगितलं जातं. वैभवही त्याच्या स्टाइलने या तात्याविंचूचा डायलॉग म्हणतो. 


भाऊच्या धक्क्यावर रितेशने घेतली जान्हवी आणि  निक्कीची शाळा

रितेशने भाऊच्या धक्क्यावर जान्हवीची कानउघाडणी करत ती बिग बॉस मराठीच्या इतिसाहासातील सर्वात वाईट स्पर्धक असल्याचं म्हटलं. तसंच रितेशने जान्हवीला खोटं वागत असल्याचंही म्हटलं. गेल्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यावर जान्हवीला आलेली चक्करही तिने केलेलं नाटक असल्याचं म्हणत रितेशने जान्हवीला सुनावलं. "तुमचा माज, तुमची दादागिरी, तुमचा उर्मटपणा हे आज इथे बंद होणार आहे. तुम्ही सर्वांना म्हणता ना की, मी तुम्हाला बाहेर काढेन. जान्हवी आज मी तुम्हाला बाहेर काढतो", असं म्हणत रितेश जान्हवीला तुरुंगात टाकतो. आता जान्हवीला गार्डन एरियामधील जेलमध्ये १ आठवडा राहायची शिक्षा मिळाली आहे. त्याबरोबरच तिला या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावरही सहभागी होता येणार नसल्याचं रितेशने म्हटलं आहे.  जान्हवीनंतर रितेशने निक्कीलाही चांगलंच सुनावलं. निक्कीने पॅडीला जोकर म्हणून हिणवलं होतं. त्यावरुन रितेशने निक्कीला खडे बोल सुनावले. त्याबरोबरच निक्कीने अंकिताला "काम नाही म्हणून घरात आल्याचं" म्हटलं होतं. यावरुनही रितेशने निक्कीचा समाचार घेतला. 

दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरात आता हळूहळू सदस्यांमधील समीकरणं बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे.या आठवड्यात अभिजीत सावंत, वैभव चव्हाण, इरिना रुडाकोव्हा आणि आर्या जाधव हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी थेट नॉमिनेट झाले आहेत. आता या आठवड्यात कोणाचा प्रवास संपतो, हे रविवारी कळेल. 
 

Web Title: bigg boss marathi 5 kangana ranaut and shreyas talpade emergency movie promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.