"निक्की-अरबाजचं एकमेकांवर प्रेम होतं, पण दोघंही..." 'कोकण हार्टेड गर्ले'ने केली पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 10:52 AM2024-10-10T10:52:02+5:302024-10-10T10:53:47+5:30
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वामध्ये निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल हे दोन चेहरे पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिले.
Ankita Walawalkar : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वामध्ये निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल हे दोन चेहरे पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिले. 'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये निक्की आणि अरबाज पटेलमध्ये पहिल्या दिवशीच चांगली मैत्री झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नंतर त्यांच्यातील जवळीकही वाढली होती. अरबाज घरातून बाहेर गेल्यानंतरही निक्की ढसाढसा रडली होती. या दोघांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावरही नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगल्या. दरम्यान, या कार्यक्रमात फिनालेला एक दिवस राहिला असताना पर्वातील एक्स स्पर्धक घरातील सदस्यांना भेटण्यासाठी घरात आले होते. त्यावेळी अरबाज घरात येताच निक्कीकडे जातो आणि तिला उचलून थेट बेडरुममध्ये घेऊन जातो. याचा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यावर आता 'कोकणकन्या' अंकिता वालावलकरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
'बिग बॉस' मधून बाहेर आल्यानंतर 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरने लोकमत फिल्मीसोबत खास बातचीत केली. त्यादरम्यान अंकिताने अरबाज-निक्कीच्या नात्यावर भाष्य केलं. तेव्हा अंकिता म्हणाली, "ज्या क्षणी अरबाज घरात आला तिथे मी होते, तेव्हा तो अचानक धावत आला आणि त्यानंतर तो पडला. ते खरंतर दाखवण्यात आलेलं नाही. तेव्हा त्याने निक्कीला उचललं आणि तो डायरेक्ट आतमध्ये गेला. आम्हाला तेव्हा कळलं होत की या दोघांमध्ये काय चाललंल. म्हणून त्यांना त्यांची स्पेस द्यावी असं आम्हाला वाटलं".
पुढे अंकिता म्हणाली, "अरबाज आणि निक्कीमध्ये जे काही होतं ते पाहिलं तर, जेवढं मी अरबाजचं निरीक्षण केलं तर त्याच्या वागण्यात निक्कीबद्दल प्रेम दिसत होतं. त्याचं तिच्यावर प्रेम होतं. पण, हे आपण नाही सांगू शकत तो मुलगा लॉयल आहे का? किंवा तो मुलगा तिच्यावर किती प्रेम करतो? ते त्या मुलीला कळायला हवं. जेवढं माझं त्याच्यासोबत बोलणं झालं त्यावरून मला जाणवंल की अरबाजचं निक्कीवर प्रेम आहे. तो मनाने हळवा सुद्धा आहे. आणि निक्कीच्या बाजूने त्यासाठी तितकेच प्रयत्न केले जात होते. पण दोघेही मान्य करत नव्हते".