मला वाइल्ड कार्ड एन्ट्री द्या! मराठी अभिनेत्रीची 'बिग बॉस'कडे मागणी, म्हणते- "बाई आणि बुगु बुगुच्या कानाखाली..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 11:40 AM2024-08-14T11:40:26+5:302024-08-14T11:40:51+5:30

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री देण्याची मागणी रंग माझा वेगळा फेम अभिनेत्रीने केली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीमधून बिग बॉसच्या घरात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

bigg boss marathi 5 marathi actress anagha atul request for wild card entry in house to slap nikki | मला वाइल्ड कार्ड एन्ट्री द्या! मराठी अभिनेत्रीची 'बिग बॉस'कडे मागणी, म्हणते- "बाई आणि बुगु बुगुच्या कानाखाली..."

मला वाइल्ड कार्ड एन्ट्री द्या! मराठी अभिनेत्रीची 'बिग बॉस'कडे मागणी, म्हणते- "बाई आणि बुगु बुगुच्या कानाखाली..."

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्या दिवसापासूनच वाद होताना दिसत आहेत. निक्की तांबाोळी आणि तिच्या टीमने बिग बॉसचं घर डोक्यावर घेतलं आहे. अगदी क्षुल्लक कारणांवरुन निक्की आणि टीम घरात वाद घालताना दिसतात. बऱ्याचदा निक्की घरातले नियमही मोडताना दिसते. यावरुन सोशल मीडियावरही तिला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. तर आता मराठी अभिनेत्रीने निक्कीच्या कानाखाली लगावण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  

बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री देण्याची मागणी रंग माझा वेगळा फेम अभिनेत्रीने केली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीमधून बिग बॉसच्या घरात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अभिनेत्री अनघा अतुलने तिच्या इन्स्टावर स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये ती म्हणते, "बिग बॉस मराठी एक विनंती आहे. एक दिवस वाइल्ड कार्ड एन्ट्री द्या. बाई आणि बुगु बुगुच्या श्रीमुखात लगावायची आहे". या स्टोरीमधून तिने निक्की तांबोळीचा बाई म्हणून उल्लेख केला आहे. पण, बुगु बुगु म्हणत अनघाने नेमका कोणावर रोख धरलेला आहे, हे मात्र कळत नाहीये. निक्कीच्या टीममधील जान्हवीला अनघाने बुगु बुगु म्हटलं आहे की घनश्यामचा उल्लेख केला आहे, याबाबत चाहत्यांमध्येही चर्चा रंगली आहे. 


दरम्यान, या आठवड्यात सदस्यांना घरातील दोन चिमुकल्या पाहुण्यांना सांभाळण्याची आणि त्यांचं मनोरंजन करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या छोट्या पाहुण्यांचा सांभाळ करताना घरातील सदस्यांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या नाकीनऊ आल्याचं दिसत होतं. या टास्कमध्ये टीम A विजयी झाली. 

बिग बॉसने या आठवड्यात अभिजीत आणि अरबाजला विशेष पॉवर कार्ड दिले होते. यामध्ये अभिजीतने पॅडीला तर अरबाजने निक्कीला नॉमिनेशनपासून सेफ केलं. तर नंतर वैभवने पॉवर कार्डचा वापर करून घनश्यामला सेफ करत  अभिजीत सावंतला नॉमिनेट केलं. त्यामुळे आता या आठवड्यात योगिता चव्हाण, निखिल दामले, सूरज चव्हण, अभिजीत सावंत हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. 
 

Web Title: bigg boss marathi 5 marathi actress anagha atul request for wild card entry in house to slap nikki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.