"तंगड्या वर करून कॅमेरासमोर झोपते हे...", निक्कीकडून वर्षा उसगावकरांचा अपमान, मराठी अभिनेत्री भडकली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 02:45 PM2024-07-31T14:45:59+5:302024-07-31T14:47:01+5:30

Bigg Boss Marathi Season 5 contestants: 'बिग बॉस मराठी'च्या घरातील निक्की आणि वर्षा उसगावकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. आता अभिनेत्री प्रणित हट्टे हिनेदेखील यावर तिचं मत मांडलं आहे.

bigg boss marathi 5 marathi actress pranit hatte slams nikki tamboli varsha usgaonkar fight | "तंगड्या वर करून कॅमेरासमोर झोपते हे...", निक्कीकडून वर्षा उसगावकरांचा अपमान, मराठी अभिनेत्री भडकली

"तंगड्या वर करून कॅमेरासमोर झोपते हे...", निक्कीकडून वर्षा उसगावकरांचा अपमान, मराठी अभिनेत्री भडकली

Bigg Boss Marathi Season 5: 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनला नुकतीच सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस मराठी'च्या घरात निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकर चर्चेत आहेत. छोट्या छोट्या कारणावरुन निक्की आणि वर्षा यांच्यात वाद होताना दिसत आहेत. आधी मेकअवरुन आणि त्यानंतर बिग बॉसचा नियम मोडल्याने वर्षा उसगावकर यांच्याबरोबर निक्कीने वाद घातला. पण, यावेळी निक्कीची जीभ घसरली आणि तिने वर्षा यांचा अरे तुरे म्हणून उल्लेख करत त्यांची अक्कल काढली. 

'बिग बॉस मराठी'च्या घरातील निक्की आणि वर्षा उसगावकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. आता अभिनेत्री प्रणित हट्टे हिनेदेखील यावर तिचं मत मांडलं आहे. प्रणित हट्टेने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणते, "ज्याप्रकारे निक्की वर्षा मॅमशी बोलत होती. ते खरंच धक्कादायक होतं. निक्की जी कोणी असेल...पण, आपण आपल्या सिनियरबरोबर कसं वागायचं याचा एक सेन्स असतो. अख्ख्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर लक्षात येईल की फक्त वर्षा मॅम सोफ्यावर बसलेल्या नव्हत्या. बाकीचे सदस्यही गार्डन एरिया आणि इतर ठिकाणी सोफ्यावर बसले होते". 

"तिसरी गोष्ट म्हणजे तंगड्या वर करून कॅमेरासमोर झोपते... हे वाक्य किती किळसवाणं आहे. आणि आता मला हे बघायचं आहे की रितेश देशमुखची यावर कशी प्रतिक्रिया असेल. कारण, सिनियर लोकांना घरात असं बघताना आणि त्यांना अशी वागणूक मिळतेय हे बघताना वाईट वाटतंय. आणि घरात कोणीतरी याबाबत बोललं पाहिजे. तिकडे घरात सगळे तोंड बंद करून बसले होते. एकामध्येही निक्कीला बोलायची हिंमत नव्हती की तू चुकीचं बोलतेस", असं म्हणत तिने संताप व्यक्त केला आहे. 


'बिग बॉस मराठी'च्या घरात नेमकं काय घडलं? 

बिग बॉसने सदस्यांना बेडवर झोपता येणार नाही असं सांगितलं होतं. पण, काही सदस्यांनी नियम मोडल्याने बिग बॉसने सदस्यांना बेड देता येणार नाही, असं सांगितलं. त्यावरुन निक्की आणि वर्षा उसगावकर यांच्यात वाद झाला. वर्षा उसगावकर बेडवर बसल्या होत्या. त्यामुळे बिग बॉसने असं सांगितलं. असं म्हणत निक्की वर्षा उसगावकर यांची थेट अक्कलच काढली. 

Web Title: bigg boss marathi 5 marathi actress pranit hatte slams nikki tamboli varsha usgaonkar fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.