एकटा पॅडी सर्वांवर भारी! संग्रामचा शर्ट खेचला अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा बिग बॉसचा नवीन प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 12:19 PM2024-09-19T12:19:38+5:302024-09-19T12:20:42+5:30

बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोत रेटारेटी खेचाखेची पाहायला मिळतेय (bigg boss marathi 5)

bigg boss marathi 5 new promo arbaz and sangram fight in captaincy task | एकटा पॅडी सर्वांवर भारी! संग्रामचा शर्ट खेचला अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा बिग बॉसचा नवीन प्रोमो

एकटा पॅडी सर्वांवर भारी! संग्रामचा शर्ट खेचला अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा बिग बॉसचा नवीन प्रोमो

बिग बॉस मराठीची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सीझनमध्ये हळूहळू रंगत निर्माण होतेय. बिग बॉस मराठीचा नवीन सीझन सुरु होऊन ५० दिवसांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. काल बिग बॉस मराठीमध्ये कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी टास्क सुरु झालाय. यावेळी कुहू कुहू वाजताच येणारं अंडं नको असलेल्या सदस्याच्या घरट्यात ठेऊन त्याला बाद करायचंय. काल या कार्यातून अंकिता आणि पॅडी कॅप्टनसीच्या उमेदवारीतून बाद झाले. नुकत्याच आलेल्या नवीन प्रोमोत मात्र जोरदार राडे होताना दिसत आहेत.

कॅप्टनसी टास्कमध्ये होणार राडा

बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोत रेटारेटी आणि खेचाखेची पाहायला मिळतेय. नवीन प्रोमोमध्ये पॅडीसाठी जोरदार स्ट्रॅटेजी लावलेली दिसतेय. धनंजय मोठ्याने म्हणताना दिसतो की, "या गटातून आम्हाला पॅडी पाहिजे". पुढे अरबाज, धनंजय, वर्षा, अभिजीत, अंकिता सगळेच जीव तोडून खेळताना दिसतात. बाल्कनीत असलेल्या सदस्यांचा आरडाओरडा सुरु असतो. शेवटी पाहायला मिळतं की, संग्राम अंडं पळवण्यासाठी पुढे जातो तोच अरबाज त्याचा शर्ट खेचतो.


संग्रामला जोरदार मार लागणार?

पुढे पाहायला मिळतं की संपूर्ण ताकदीनिशी संग्राम अंडं घ्यायला पुढे जातो. अरबाज त्याचा शर्ट खेचून त्याला रोखण्याचा प्रयत्न करतो. शेवटी अरबाजच्या हातून शर्टाची पकड ढिली होते आणि संग्राम जोरात पुढे जातो. "ओह शिट", असं शेवटी अरबाज म्हणताना दिसतो. यामुळे संग्रामला मोठा मार बसलाय का? संग्राम अंडं घेण्यात यशस्वी झालाय का? याची जोरदार चर्चा आहे. आता नक्की काय घडलंय हे प्रेक्षकांना आजच्या भागात पाहायला मिळेल.

 

Web Title: bigg boss marathi 5 new promo arbaz and sangram fight in captaincy task

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.