Bigg Boss Marathi 5: घरातल्या छोट्या पाहुण्यांमुळे रंगला मोठा वाद, बाळांना खेळवताना सदस्यांमध्ये धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 17:43 IST2024-08-12T17:42:22+5:302024-08-12T17:43:45+5:30
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा नवीन प्रोमो व्हायरल झालाय. यात घरात आलेल्या दोन नवीन पाहुण्यांमध्ये चांगलाच वाद रंगलेला दिसून आला (bigg boss marathi 5)

Bigg Boss Marathi 5: घरातल्या छोट्या पाहुण्यांमुळे रंगला मोठा वाद, बाळांना खेळवताना सदस्यांमध्ये धक्काबुक्की
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये दिवसेंदिवस रंगत वाढताना दिसत आहे. घरात कधी आसू कधी हासू असं वातावरण दिसून येतं. अशातच बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये आज वेगळाच टास्क रंगताना दिसणार आहे. घरात दोन पाहुण्यांची एन्ट्री झालीय. बिग बॉसच्या घरात आलेल्या बाळांना सांभाळण्याची जबाबदारी सर्वांवर आहे. पण ही जबाबदारी घेण्यामध्ये स्पर्धकांमध्ये चांगलीच धक्काबुक्की झालेली दिसतेय.
घरातील आनंंदाच्या वातावरण क्षणात बदललं
'बिग बॉस मराठी'च्या घरात दोन बाहुले आले आहेत. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण आहे. घरात बाळ येण्याच्या आनंदात दोन्ही टीमने आपापल्या बाळांना सांभाळण्याचा आदेश 'बिग बॉस'ला दिला आहे. प्रोमोमध्ये निक्की-अरबाज, अंकिता, वर्षा ताई हे सदस्य बाळाचा सांभाळ करताना दिसत आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत,"घरात बेबी येण्याच्या आनंदात दोन्ही टीमने आपापल्या बेबींना सांभाळायचं आहे".
'
लंगोट बदलण्यावरुन झाला वाद
दरम्यान कुशीत बेबी असलेली निक्की सूरजकडे पाहून म्हणते,"बुक्कीत टेंगूळ आपण आईला देऊयात". तर दुसरीकडे वर्षा ताई बेबीला सांगतात,"निक्की नावाच्या बाईने हैदोस माजवला आहे". त्यानंतर 'बिग बॉस' बेबीचं लंगोट बदलण्याची वेळ झाली असल्याचं सांगतात. आता या लंगोट बदलण्यावरुन घरात काय धमाका होणार हे पाहावे लागेल. बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा हा एपिसोड आज रात्री ९ वाजता प्रेक्षकांना बघायला मिळेल.