निक्कीने DP दादासाठी आणलं जेवणाचं ताट, धनंजय म्हणतो- "माझी बायको हे बघत असेल तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 01:48 PM2024-08-09T13:48:35+5:302024-08-09T13:48:58+5:30

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : DP दादा त्याच्या कोल्हापुरी स्टाइलने बिग बॉसच्या घरातील सदस्यांबरोबरच प्रेक्षकांची मनंही जिंकून घेत आहे. आता बिग बॉसच्या घरातील धनंजय आणि निक्कीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

bigg boss marathi 5 nikki tamboli and dhananjay powar teasing each other video | निक्कीने DP दादासाठी आणलं जेवणाचं ताट, धनंजय म्हणतो- "माझी बायको हे बघत असेल तर..."

निक्कीने DP दादासाठी आणलं जेवणाचं ताट, धनंजय म्हणतो- "माझी बायको हे बघत असेल तर..."

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. यंदाच्या सीझनमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर DP दादा म्हणजेच धनंजय पोवार सहभागी झाला आहे. DP दादा त्याच्या कोल्हापुरी स्टाइलने बिग बॉसच्या घरातील सदस्यांबरोबरच प्रेक्षकांची मनंही जिंकून घेत आहे. घरातील सगळ्याच सदस्यांबरोबर ते मस्तीही करताना दिसतात. आता बिग बॉसच्या घरातील धनंजय आणि निक्कीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 

या व्हिडिओत निक्की आणि धनंजय सोफ्यावर जेवताना दिसत आहेत. धनंजय म्हणतो, "जिने दोन हिंदी चित्रपट, तीन साऊथ सिनेमे केलेत अशी हिरोईन माझं जेवणाचं ताट घेऊन  उभी आहे. माझ्यासारखा राजा या राज्याला मिळणं अशक्य आहे...ते सोडा पण, हे राज्य आणि ही गोड प्रजा तुम्ही दिली आहे". त्यानंतर धनंजय निक्कीची थोडी थट्टाही करताना पुढे दिसत आहे. आधी कॅमेराकडे आणि नंतर निक्कीकडे बघून तो म्हणतो, "या गोड प्रजेमध्ये हे लाल भडक...आज लिपस्टिक लावलेली नाहीये". त्यानंतर कोणीतरी त्याला सांगतं की निक्कीने लिपस्टिक लावली आहे. मग आश्चर्यचकित होत धनंजय "तू लिपस्टिक लावलीये...मला वाटलं नॅचरल ओठ आहेत...देवा...", असं निक्कीच्या स्टाइलमध्ये म्हणतो. 


त्यानंतर पुन्हा धनंजय कॅमेऱ्याकडे बघून "आज जर माझी बायको हे बघत असेल तर तू बघ...मला सतत जेवायला देताना घे की, खा की करतेस...२ हिंदी आणि ३ साऊथ सिनेमे केलेली हिरोइन माझं ताट घेऊन इथे उभी आहे. खावा की खावा की म्हणतेय मला...बघ ए बघ..." असं कोल्हापुरी स्टाइलमध्ये म्हणतो. 

दरम्यान, पहिल्या आठवड्यात धनंजय नॉमिनेट झाला होता. या आठवड्यात मात्र तो सेफ आहे. पण, निक्की मात्र या आठवड्यात नॉमिनेट झाली आहे. निक्कीबरोबर योगिता चव्हाण, पॅडी कांबळे, सूरज चव्हाण, निखिल दामले, घनश्याम दरवडे हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. 

Web Title: bigg boss marathi 5 nikki tamboli and dhananjay powar teasing each other video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.