पुण्याच्या दहीहंडीत निक्कीच्या 'बाईSsss' डायलॉगवर पुणेकरांचे ठुमके, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 06:18 PM2024-08-28T18:18:02+5:302024-08-28T18:19:53+5:30
महाराष्ट्रात सध्या निक्कीची चर्चा पाहायला मिळतेय. नुकतंच पुण्यातील दहीहंडी उत्सवातही निक्कीचा जलवा दिसून आला.
Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाला सुरुवात झाल्यापासून निक्की तांबोळी (Nikki Tamboli) चर्चेत आली. पहिल्याच आठवड्यात अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्याशी वाद घालत ती चर्चेत आली होती. या आठवड्याची कॅप्टन डोंबिवलीकर निक्की तांबोळी आहे. निक्की पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस मराठी'च्या घरावर राज्य करताना दिसून येत आहे. महाराष्ट्रात सध्या निक्कीची चर्चा पाहायला मिळतेय. आता नुकतंच पुण्यातील (Pune) दहीहंडी उत्सवातही निक्कीचा जलवा दिसून आला.
'बिग बॉस मराठी'च्या घरात गप्पा मारताना निक्कीने आपल्या खास शैलीत 'बाईSSS' आणि 'हा काय प्रकार' हा शब्द उच्चारला होता. सोशल मीडियावरही निक्कीचे हे शब्द चांगलेच गाजले. पुण्याच्या दहीहंडी कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये डीजेवर सुरू असलेल्या गाण्यात निक्कीचा जलवा पाहायला मिळाला. दहीहंडी उत्सवात 'बिलनशी नागिन निघाली' या गाण्यात निक्कीच्या खास शैलीतील 'बाईSSS' हा शब्द मिक्सिंग करण्यात आला. या तालावर गोविंदाही थिरकले.हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
In Dahi Handi And Baiee Ka Tadka @nikkitamboli U r trend setter #NikkiTamboli#BiggBossMarathipic.twitter.com/CHs797dUgy
— Nikki_Holic 💕 (@NikkiFan0) August 28, 2024
निक्की ही मुळची छत्रपती संभाजीनगरची आहे. एक बोल्ड अभिनेत्री म्हणून निक्कीला ओळखलं जातं. निक्कीचा जन्म २१ ऑगस्ट १९९६ रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिने छत्रपती संभाजीनगरमध्येच शालेय आणि पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. निक्कीचे वडिल हे व्यावसायिक असल्याची माहिती आहे. सध्या आपल्या कुटुंबासोबत डोंबिवलीमध्ये राहते.
निक्कीने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली आणि नंतर टीव्ही जाहिरातींमध्ये काम केलं. यासोबतच तिने काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच नक्की 'खतरों के खिलाडी' या शोमध्येही सहभागी झाली होती. निक्की ही 'बिग बॉस हिंदी'च्या 14 व्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. यात ती टॉप 3 पर्यंत पोहोचली होती. पण तिला या शोचं विजेतेपद पटकावता आलं नाही. 'हिंदी बिग बॉस'नंतर निक्की 'मराठी बिग बॉस'मध्ये काय हवा करते हे पाहणं महत्वाचं आहे.