"तू सगळ्यांना विकून खाशील...", निक्कीकडून इरिनाचा अपमान, वैभवची मात्र बघ्याची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 04:26 PM2024-08-21T16:26:44+5:302024-08-21T16:27:04+5:30

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : "ही खूपच चालू आहे", इरिनावर भडकली निक्की, वैभव मात्र शांत

bigg boss marathi 5 nikki tamboli insult irina in front of vaibhav chavan video viral | "तू सगळ्यांना विकून खाशील...", निक्कीकडून इरिनाचा अपमान, वैभवची मात्र बघ्याची भूमिका

"तू सगळ्यांना विकून खाशील...", निक्कीकडून इरिनाचा अपमान, वैभवची मात्र बघ्याची भूमिका

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये सुरुवातीपासूनच चाहत्यांना अनेक सरप्राइजेस मिळाले. परदेसी गर्ल असलेल्या इरिना रुडाकोवा हिने बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेतल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण, इरिनाने तिच्या मराठमोळ्या मनाने प्रेक्षकांची मनंही जिंकून घेतली. एकदशीला उपवास पकडणाऱ्या इरीनाचं रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर कौतुकही केलं होतं. पण, आता बिग बॉसच्या घरात मात्र निक्कीने इरिनाशी वाद घातल्याचं पाहायला मिळत आहे. 

बिग बॉस मराठीच्या घरातील एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये इरिना आणि निक्की एकमेकींशी वाद घालताना दिसत आहेत. गार्डन एरियामध्ये निक्की, इरिना, वैभव आणि जान्हवी बसल्याचं दिसत आहे. इरिना निक्कीला म्हणते, "मी तुझ्या पाठीमागे तुझ्याबद्दल काहीच बोलत नाही". त्यावर निक्की तिला "तुझ्या पद्धतीने मी घरात का वागू?" असं म्हणते. मग इरिना उत्तर देत म्हणते की "ठीक आहे, मग पाठीमागून सगळ्यांच्या चहाड्या कर". 


इरिनाचं हे उत्तर ऐकून निक्कीचा पारा चढल्याचं पाहायला मिळत आहे. "तू सगळ्यांना विकून खाणाऱ्यातली आहेस. ही खूपच चालू आहे. मला म्हणते की मी रिजेक्ट... हिला हिच्या देशात रिजेक्ट केलं म्हणून ही आपल्या देशात आणि शोमध्ये आलीये", असं निक्की म्हणते. पण, या सगळ्यात इरिनाच्या बाजूला उभा असलेला वैभव मात्र काहीच बोलताना दिसत नाहीये. निक्की आणि इरिनाच्या भांडणात वैभवची बघ्याची भूमिका दिसत आहे. 

दरम्यान, बिग बॉस मराठीचा चौथा आठवडा सुरू झाला असून दिवसेंदिवस हा खेळ अधिक रंजक होत चालला आहे. त्याबरोबरच घरातील सदस्यांची समीकरणंही बदलत असल्याचं पाहायला मिळत आहेत.  सुरुवातीपासूनच निक्की, जान्हवी, वैभव, अरबाज, छोटा पुढारी यांचा ग्रुप तयार झाला होता. वैभवबरोबरच्या मैत्रीमुळे या ग्रुपमध्ये इरिनाही सहभागी झाली.  पण, आता मात्र त्यांच्या ग्रुपमध्ये फूट पडणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. 

Web Title: bigg boss marathi 5 nikki tamboli insult irina in front of vaibhav chavan video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.