वर्षाताई कॅप्टन होताच निक्कीची मनमानी, काम करणार नाही म्हणत सोफ्यावरच झोपली, अभिजीत चिडला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 09:15 AM2024-09-03T09:15:54+5:302024-09-03T09:16:47+5:30

Bigg Boss Marathi Season 5 : यंदाच्या आठवड्यात वर्षा उसगावकर यांच्यावर घराच्या कॅप्टनपदाची जबाबदारी आहे. कॅप्टन बदलल्यानंतर निक्कीने पुन्हा तिची मनमानी करण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे.

bigg boss marathi 5 nikki tamboli said i wont do any duties varsha tai cat fight abhijeet sawant gets angry | वर्षाताई कॅप्टन होताच निक्कीची मनमानी, काम करणार नाही म्हणत सोफ्यावरच झोपली, अभिजीत चिडला अन्...

वर्षाताई कॅप्टन होताच निक्कीची मनमानी, काम करणार नाही म्हणत सोफ्यावरच झोपली, अभिजीत चिडला अन्...

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनला एक महिना पूर्ण होऊन आता सहावा आठवडा सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात निक्की कॅप्टन होती. यंदाच्या आठवड्यात वर्षा उसगावकर यांच्यावर घराच्या कॅप्टनपदाची जबाबदारी आहे. कॅप्टन बदलल्यानंतर निक्कीने पुन्हा तिची मनमानी करण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. 

बिग बॉसच्या घरातील नवा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये निक्की घरातील कोणतंही काम करणार नसल्याचं म्हणत आहे. "मी कुठलीही ड्युटी करणार नाही", असं निक्की म्हणत आहे. त्यावर वर्षाताई तिला "तू अशी मनमानी करू शकत नाहीस" असं म्हणत आहेत. त्यानंतर निक्की गार्डन एरियामधील सोफ्यावरच झोपली असल्याचं दिसत आहे. बिग बॉसने कोंबडा आरवला तरीदेखील निक्की उठत नाही. त्यामुळे घरातील सर्व सदस्यांबरोबर अभिजीतही तिच्यावर चिडल्याचं पाहायला मिळत आहे. 


अभिजीत तिला म्हणतो, "अरे निक्की झोपून काय होणारे?". त्यावर निक्की त्याला म्हणते की "मी आता १० वेळा झोपते. १० वेळा कोंबडा आरवू दे...मग तू माझ्याशी बोलायला ये". तिच्या बाजूला अरबाजही बसल्याचं पाहायला मिळत आहे. तेवढ्यात आर्या निक्कीवर थंड थंड पाणी टाकूया, असं म्हणते. तेव्हा निक्की चिडते आणि म्हणते, "जर हिने माझ्या अंगावर पाणी टाकलं तर...". आता पुन्हा निक्कीवरुन घरात वाद होणार असल्याचं दिसत आहे. 

दरम्यान, नुकतंच या आठवड्यातील नॉमिनेशन कार्य पार पडलं आहे. या आठवड्यात वर्षा उसगावकर घराच्या कॅप्टन असल्यामुळे त्या सेफ आहेत. यंदाच्या आठवड्यात घनश्याम दरवडे, सूरज चव्हाण, आर्या जाधव, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, अरबाज पटेल, निक्की तांबोळी हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. 
 

Web Title: bigg boss marathi 5 nikki tamboli said i wont do any duties varsha tai cat fight abhijeet sawant gets angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.