"त्यांच्या गुडघ्यात मेंदू आहे...", 'बिग बॉस'च्या घरात वर्षा उसगावकरांबद्दल पुन्हा बरळली निक्की
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 05:11 PM2024-08-04T17:11:16+5:302024-08-04T17:12:20+5:30
Bigg Boss Marathi Season 5 Contestants : आता पुन्हा निक्कीने वर्षा उसगावकरांबद्दल वक्तव्य केलं आहे. बिग बॉसच्या घरातील एक नवा व्हिडिओ समोर आला आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा नवा सीझन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. पहिल्या दिवसापासूनच वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळी यांच्यात वाद होत आहेत. छोट्या छोट्या कारणांवरुन त्या एकमेकींशी सतत भांडताना दिसत आहेत. निक्कीने अनेकदा बिग बॉसच्या घरात वर्षा उसगावकरांचा अपमान केल्याचं दिसून आलं. त्यानंतर रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर निक्कीची चांगलीच शाळा घेतली.
पण, आता पुन्हा निक्कीने वर्षा उसगावकरांबद्दल वक्तव्य केलं आहे. बिग बॉसच्या घरातील एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. भाऊच्या धक्क्यावर एक खेळ खेळला जाणार आहे. या व्हिडिओत रितेश निक्कीला एक एक्स रे उचलायला सांगतो. निक्कीने उचलेल्या एक्स रे मध्ये गुडघ्यात मेंदू असल्याचं दाखविण्यात आला आहे. आता निक्कीला घरातील एका अशा सदस्याचं नाव घ्यायचं आहे. ज्याच्या डोक्यात नव्हे तर गुडघ्यात मेंदू आहे, असं तिला वाटतं. निक्की थोडा विचार करत असल्याचं पाहून रितेश म्हणतो की तुम्ही स्वत:चंच नाव घेऊ नका. त्यानंतर घरातील काही मंडळी हसायला लागतात.
मग निक्की म्हणते, "मला हे एका व्यक्तीला द्यायचं आहे. पण, परत सगळे म्हणतील की मी त्यांचा अनादर करते. त्यामुळे मला हे कोणाला द्यायचंच नाहीये". त्यावर रितेश तिला तुम्ही हा खेळ ओपनली खेळा, असं म्हणतो. त्यानंतर निक्की वर्षा उसगावकर यांचं नाव घेते. "मला असं वाटतं की मॅम कधी कधी काही टॉपिक उगाच ताणून धरतात. त्यामुळे त्यांच्या गुडघ्यात मेंदू आहे, असं वाटतं", असं निक्की म्हणते. दरम्यान, 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनमधील पहिल्या आठवड्यात अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, धनंजय पवार हे सदस्य नॉमिनेट झाले होते. आता यांच्यापैकी कोणाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपणार हे आज कळेल.
'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक
वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण