Bigg Boss Marathi 5 : कोण जाणार घराबाहेर? 'या' सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 09:37 AM2024-08-23T09:37:03+5:302024-08-23T09:37:43+5:30

नुकतंच 'बिग बॉस'च्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. यावेळी चार स्पर्धक थेट नॉमिनेट झाले आहेत.

Bigg Boss Marathi 5 Nomination Task Irina Rudakova Vaibhav Chavan Abhijeet Sawant And Arya Jadhav Nominated | Bigg Boss Marathi 5 : कोण जाणार घराबाहेर? 'या' सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार!

Bigg Boss Marathi 5 : कोण जाणार घराबाहेर? 'या' सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार!

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व सध्या चांगलं गाजत आहे. या पर्वातील स्पर्धकांनी पहिल्या दिवसांपासून एकप्रकारे वेगळा धिंगाणा घातला आहे. नुकतंच 'बिग बॉस'च्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. यावेळी चार स्पर्धक थेट नॉमिनेट झाले आहेत. आता कोणता स्पर्धक घरातून बाहेर पडणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

कलर्स मराठी वाहिनीने नुकतंच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. आर्या जाधव, अभिजित सावंत, वैभव आणि इरिना हे नॉमिनिटे झाले आहेत. पोस्टमध्ये लिहलंय, 'तुमच्या आवडत्या contestants ना आजच JioCinema वर जाऊन वोट करा आणि त्यांना बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडण्यापासून वाचवा. वोटिंग लाइन्स शनिवार 24 ऑगस्ट, दुपारी 12 पर्यंत चालू आहेत. वोट करण्यासाठी Bio मधील link वर क्लिक करा'. आता या सदस्यांमध्ये कोण घराबाहेर जाईल आणि कोण सेफ होईल हे भाऊच्या धक्क्यावर कळणार आहे.


'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांना आतापर्यंत अनेक गोष्टींवर राडे घातले आहेत. तसेच आतापर्यंत घरातील तीन सदस्यांनी बिग बॉसच्या घराचा निरोप घेतलाय. त्यामुळे आता खेळही चांगलाच रंगात आला असल्याचं पाहायला मिळतंय.  निक्की तांबोळी बिग बॉस मराठीच्या घरातील नवीन कॅप्टन बनली आहे, त्यामुळे ती नॉमिनेशनपासून सुरक्षित झाली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातून आतापर्यंत पुरुषोत्तम पाटील, योगिता चव्हाण आणि निखिल दामले हे सदस्य बाहेर पडले आहेत.    

Web Title: Bigg Boss Marathi 5 Nomination Task Irina Rudakova Vaibhav Chavan Abhijeet Sawant And Arya Jadhav Nominated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.