"आज महाराष्ट्रात एक वेळ जेवण...", बिग बॉसने 'ही' जाणीव करुन देताच पॅडीला अश्रू अनावर, सदस्यही भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 04:57 PM2024-09-13T16:57:53+5:302024-09-13T17:09:22+5:30

Bigg Boss Marathi 5: घरातील काही सदस्यांनी अन्नाची नासाडी केल्याने बिग बॉसने त्यांना उकडलेलं अन्न खाण्याची शिक्षा दिली आहे.

bigg boss marathi 5 paddy kambale janhvi killekar and ankita walawakar gets emotional video | "आज महाराष्ट्रात एक वेळ जेवण...", बिग बॉसने 'ही' जाणीव करुन देताच पॅडीला अश्रू अनावर, सदस्यही भावुक

"आज महाराष्ट्रात एक वेळ जेवण...", बिग बॉसने 'ही' जाणीव करुन देताच पॅडीला अश्रू अनावर, सदस्यही भावुक

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या घरात कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने वाद होत असतात. अनेकदा वेगवेगळी नाटकंही बिग बॉसच्या घरात पाहायला मिळतात. घरातील काही सदस्यांनी अन्नाची नासाडी केल्याने बिग बॉसने त्यांना उकडलेलं अन्न खाण्याची शिक्षा दिली आहे. अन्न ही मूलभूत गरज आहे. पण आजही महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पुरेसं अन्न न मिळाल्याने लोकांना फक्त पाणी पिऊन झोपावं लागतं. पण बिग बॉसच्या घरातील काही सदस्य मात्र अन्न वाया घालवताना दिसून आले आहेत. याची जाणीव व्हावी म्हणून बिग बॉसने सदस्यांना ही शिक्षा दिला. 

यानंतर घरातील सदस्य भूकेने तळमळू लागले. याचा एक नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये अंकिता म्हणते, "भूक लागली आहे बिग बॉस". त्यानंतर बिग बॉस म्हणत आहेत,"आज महाराष्ट्रात एक वेळच्या अन्नासाठीदेखील चूल पेटणं शक्य होत नाही. या परिस्थितीची झलक मिळावी म्हणून आपण केवळ उकडलेलं अन्न खा, असं सांगितलं". बिग बॉसने हे सांगितल्यानंतर घरातील सदस्य भावुक झाल्याचं दिसत आहे. पॅडी दादा आणि जान्हवीला अश्रू अनावर झाल्याचं दिसत आहे. पॅडी म्हणतो,"उकडलेल्या अन्नाचं इतकं वाटलं नव्हतं बिग बॉस बोलल्यानंतर ते जास्त जाणवतंय". 


अन्न वाया घालवणाऱ्या सदस्यांना किती दिवस फक्त उकडलेलं अन्न खावं लागणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री झाल्यापासून सदस्यांमधील समीकरणं बदलली आहेत. बॉडीबिल्डर संग्राम चौगुलेने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतल्यानंतर घरातील गणितं पुन्हा बदलली आहेत. 
 

Web Title: bigg boss marathi 5 paddy kambale janhvi killekar and ankita walawakar gets emotional video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.