"मला एकदा घरात पाठवा", प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बिग बॉसला विनंती, म्हणाला, "अरे मर्दांनो..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 11:04 AM2024-09-05T11:04:11+5:302024-09-05T11:05:06+5:30

घरात पहिल्या दिवसापासून निक्कीचे प्रत्येकाशी वाद झाले आहेत. सहावा आठवड्यातही निक्कीचा मनमानी कारभार सुरू आहे.

Bigg Boss Marathi 5: Pushkar Jog Criticises Nikki Tamboli | varsha usgaonkar | "मला एकदा घरात पाठवा", प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बिग बॉसला विनंती, म्हणाला, "अरे मर्दांनो..."

"मला एकदा घरात पाठवा", प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बिग बॉसला विनंती, म्हणाला, "अरे मर्दांनो..."

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन सध्या निक्की तांबोळीमुळे प्रचंड चर्चेत आहे. घरात पहिल्या दिवसापासून निक्कीचे प्रत्येकाशी वाद झाले आहेत. सहावा आठवड्यातही निक्कीचा मनमानी कारभार सुरू आहे. निक्कीच्या वागणुकीवर आता नेटकऱ्यांसह मराठी कलाविश्वातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावर आता मराठी अभिनेता पुष्कर जोगने प्रतिक्रिया दिली आहे. 

बिग बॉस मराठीच्या सहाव्या आठवड्यात वर्षा उसगांवकर कॅप्टन आहेत. त्यांची कॅप्टन्सी सुरू झाल्यापासून घरात कोणतंही काम करणार नाही असा पवित्रा निक्कीने घेतल्याचं दिसून आलं. निक्कीनं वर्षा यांच्याशी भांडताना "तुमच्यासमोर मी आत बाथरुममध्ये जाऊन दाखवेन. मला अडवणारा अजून जन्माला आलेला नाही. तुम्ही मला हुकूम देऊ नका. कॅप्टन आहात, तर कॅप्टनच राहा. इथे बादशाह नका होऊ…माझा बाप बनू नका. समजलं ना…? कॅप्टनच्या हैसियतमध्ये राहा", असं म्हटलं. 

निक्कीनं पुन्हा एकदा वर्षा यांचा अपमान केल्यानं प्रेक्षक संतापले आहेत. निक्की तांबोळीच्या खेळाबद्दल पुष्कर जोगने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. पुष्करने पोस्टमध्ये लिहलं, "मला एकदा घरी पाठवा… वर्षा उसगांवकर मॅमचा एवढा अपमान मी सहन करू शकत नाही. अरे मर्दांनो उठा… त्या फिक्कीचा माज उतरावा #कहर". ही पोस्ट पुष्करने 'कलर्स मराठी' व 'बिग बॉस मराठी'ला देखील टॅग केलं आहे.

दरम्यान, या आठवड्यात निक्की, अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, घनःश्याम दरोडे, आर्या जाधव, धनंजय पोवार, अरबाज पटेल हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आतापर्यंत  'बिग बॉस मराठी'च्या घरातून पुरुषोत्तम पाटील, योगिता चव्हाण आणि निखिल दामले हे सदस्य बाहेर पडले आहेत.  आता या आठवड्यात कोणत्या सदस्याचा प्रवास इथेच संपेल याकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. 
 

Web Title: Bigg Boss Marathi 5: Pushkar Jog Criticises Nikki Tamboli | varsha usgaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.