"डीपी दादा घराबाहेर जाणार", मराठी अभिनेत्याचा दावा! चाहते भडकले, म्हणाले- "तुम्ही..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 10:42 AM2024-09-03T10:42:04+5:302024-09-03T10:42:52+5:30

Bigg Boss Marathi 5 : डीपी दादा घराबाहेर जातील, असं म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्यावर प्रेक्षक भडकले, म्हणाले...

bigg boss marathi 5 pushkar jog said dp dada will eliminated dhananjay powar fans reacted | "डीपी दादा घराबाहेर जाणार", मराठी अभिनेत्याचा दावा! चाहते भडकले, म्हणाले- "तुम्ही..."

"डीपी दादा घराबाहेर जाणार", मराठी अभिनेत्याचा दावा! चाहते भडकले, म्हणाले- "तुम्ही..."

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या यंदाच्या आठवड्यात एकूण ७ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. नॉमिनेशन प्रक्रियेत घरातील सदस्यांनी घनश्याम दरवडे, सूरज चव्हाण, आर्या जाधव, अभिजीत सावंत, अरबाज पटेल, निक्की तांबोळी यांच्याबरोबरच धनंजय पोवार यांनाही नॉमिनेट केलं. या नॉमिनेशन कार्यानंतर या आठवड्यात घराबाहेर कोण जाणार याबाबत आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. अशातच मराठी अभिनेतापुष्कर जोगने केलेल्या कमेंटमुळे मात्र चाहते भडकले आहेत.  

कलर्स मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया पेजवरुन नॉमिनेट झालेल्या सदस्यांबाबत एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टवर अभिनेता पुष्कर जोगने कमेंट करत या आठवड्यात कोणता सदस्य घराबाहेर जाईल, याबाबत अंदाज लावला आहे. "या आठवड्यात घनश्याम घराबाहेर जाईल", अशी कमेंट पुष्करने केली आहे. पण, याबरोबरच पुढच्या आठवड्यात डीपी दादा घराबाहेर जातील, असंही त्याने म्हटलं आहे. त्यामुळे धनंजयचे चाहते चिडले आहेत. चाहत्यांनी पुष्करच्या या कमेंटवर रिप्लाय केला आहे. 


"कोल्हापूर नाव माहीत नाही आहे ना, डीपी दादा टॉप ५ मध्ये असणार", "तुला कोणी विचारलंय का?", "डीपा फायनल ३ मध्ये असणार", "हे तुम्ही सांगू नका", " पुष्कर DP दा टॉप 3 मध्ये येणार असा महाराष्ट्र म्हणतोय....सो भविष्यवाणी न केलेली बरी आपण" अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. 

दरम्यान, पुष्कर जोगी बिग बॉस मराठीचा स्पर्धक होता. बिग बॉस मराठीच्या पहिल्याच पर्वात तो सहभागी झाला होता. या पर्वात मेघा धाडे विजेती ठरली होती. तर पुष्कर उपविजेता होता.  

Web Title: bigg boss marathi 5 pushkar jog said dp dada will eliminated dhananjay powar fans reacted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.