" हौसेने केली बायको ती निघाली सायको..."  बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणचे गुलीगत उखाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 01:49 PM2024-08-05T13:49:48+5:302024-08-05T13:51:51+5:30

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील सदस्य म्हणजे रीलस्टार सूरज चव्हाणची सगळीकडेच चर्चा रंगताना दिसते आहे.

bigg boss marathi 5 season reel star suraj chavan of teaching marathi ukhane to other contestant video goes viral on social media | " हौसेने केली बायको ती निघाली सायको..."  बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणचे गुलीगत उखाणे

" हौसेने केली बायको ती निघाली सायको..."  बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणचे गुलीगत उखाणे

Bigg Boss Marathi 5:  सध्या मनोरंजन विश्वात कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व चांगलंच चर्चेत आहे. या पर्वाला प्रेक्षकांकडून भरभरून पसंती मिळते आहे. शिवाय या पर्वातील सदस्य म्हणजे  रीलस्टार सूरज चव्हाणची सगळीकडेच चर्चा रंगताना दिसते आहे. गुलीगत धोका म्हणत रिल स्टार म्हणून प्रसिद्धी मिळवलेला सूरज बिग बॉसच्या घरात आपल्या अतरंगी स्टाईलने प्रत्येकाची मनं जिंकत आहे. 


गुलीगत फेम रीलस्टार सूरज चव्हाण सध्या बिग बॉसच्या घरात चांगला खेळताना दिसतो आहे. त्याच्या वागण्यामुळे तो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. नुकताच सोशल मीडियावर बिग बॉसच्या घरातील एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये सूरज चव्हाण इतर स्पर्धकांना उखाण्यांचे धडे देत आहे. आपल्या गुलीगत उखाण्यांनी तो सगळ्यांना इम्प्रेस करताना दिसत आहे. 

कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्रामवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये सूरज उखाणे घेत आहे. या व्हिडीओमध्ये , "चांदीच्या ताटात बट्याट्याची भाजी, तुझी बहिण माझी मी तुझा गुलीगत दाजी"असा हटके उखाणा घेतो. याशिवाय सूरज व्हिडीओमध्ये आणखी एक उखाणा घेतो त्यात तो म्हणतो, "हौसेने केली बायको ती निघाली सायको". सूरजचे असे हटके उखाणे ऐकताच बिग बॉसच्या घरात एकच हशा पिकला. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केल्याचा पाहायला मिळतोय.

बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक-

वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री घेतली आहे. 

दरम्यान, पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील घराच्या बाहेर पडले आहेत. त्यांचा या पर्वातील प्रवास इथेच संपला आहे.  

Web Title: bigg boss marathi 5 season reel star suraj chavan of teaching marathi ukhane to other contestant video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.