संग्रामबरोबर सूरजचा गुलीगत पॅटर्न, बनवतोय टीम, म्हणतो- "आपण यांना हलवून टाकू, हादरलेच पाहिजेत..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 11:20 AM2024-09-10T11:20:33+5:302024-09-10T11:20:52+5:30

Bigg Boss Marathi Season 5 : घराचा कॅप्टन असलेला सूरज संग्रामबरोबर टीम बनवण्याच्या तयारीत दिसत आहे. बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे.

bigg boss marathi 5 suraj chavan and sangram choughule game planning conversation | संग्रामबरोबर सूरजचा गुलीगत पॅटर्न, बनवतोय टीम, म्हणतो- "आपण यांना हलवून टाकू, हादरलेच पाहिजेत..."

संग्रामबरोबर सूरजचा गुलीगत पॅटर्न, बनवतोय टीम, म्हणतो- "आपण यांना हलवून टाकू, हादरलेच पाहिजेत..."

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात सोमवारी पहिल्या वाइल्ड कार्डची एन्ट्री झाली. बॉडीबिल्डर संग्राम चौगुलेने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. वाइल्ड कार्ड एन्ट्रीआधीच A आणि B टीममध्ये फूट पडली होती. त्यामुळे घरातील काही समीकरणं बदलल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, संग्रामच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीमुळे खेळात नवा ट्विस्ट आला आहे. 

घरात संग्रामची एन्ट्री होताच पुन्हा समीकरणं बदलल्याचं दिसत आहे. संग्रामने वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतात अरबाज आणि निक्कीला टार्गेट केलं. आता घराचा कॅप्टन असलेला सूरज संग्रामबरोबर टीम बनवण्याच्या तयारीत दिसत आहे. बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये संग्राम आणि सूरज एकमेकांबरोबर किचर एरियामध्ये बोलताना दिसत आहे. सूरज संग्रामला बोलतो, "यांना हलवून टाकू आता आपण". त्यावर संग्राम म्हणतो, "कशाला कोणाला हलवायचं आहे". "गेममध्ये त्यांना हलवून टाकू. हादरलेच पाहिजेत", असं सूरज म्हणत आहे. त्यावर संग्राम त्याला "गेममध्ये असेल ते करायचं...कुणाला हलवायचं नाही काही नाही...आपलं काही चुकलं नाही पाहिजे", असं म्हणतो. 


सूरज संग्रामला म्हणतो, "तुला सगळं समजतंय भाऊ...तुला तेवढं ज्ञान आहे. मी कॉलेजमध्ये गेलो नाही म्हणून मला ज्ञान नाही. मी शिकलो असतो ना मग माझं डोकं चाललं असतं". त्यावर संग्राम सूरजला मोलाचा सल्ला देतो. संग्राम म्हणतो, "डोकं चालण्यासाठी शिकण्याची गरज नसते. आपण रोज जे करतो ते ऐकलं तरी या गोष्टी करू शकतो". 

दरम्यान, गेल्या आठवड्यात छोटा पुढारी घनश्याम दरवडेचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. तर या आठवड्यात धष्टपुष्ट शरीरयष्टी असलेल्या संग्राम चौगुलेने वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतल्याने खेळात मोठा ट्विस्ट आला आहे. आता बिग बॉसचा खेळ अधिक रंजक होताना दिसत आहे. 
 

Web Title: bigg boss marathi 5 suraj chavan and sangram choughule game planning conversation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.